Mumbai : ‘नेस्को’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जामीन; वरळी कॉन्सर्ट ड्रग्ज ओव्हरडोसप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची कारवाई 
मुंबई

Mumbai : ‘नेस्को’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना जामीन; वरळी कॉन्सर्ट ड्रग्ज ओव्हरडोसप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाची कारवाई

गोरेगावमध्ये एप्रिल महिन्यात आयोजित कॉन्सर्ट झालेल्या कथित ड्रग्ज ओव्हरडोस, दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नेस्कोच्या दोन कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर केला आहे.

Swapnil S

मुंबई : गोरेगावमध्ये एप्रिल महिन्यात आयोजित कॉन्सर्ट झालेल्या कथित ड्रग्ज ओव्हरडोस, दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने शुक्रवारी नेस्कोच्या दोन कर्मचाऱ्यांना जामीन मंजूर केला आहे.

उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती श्याम चांदक यांच्या एकल पीठाने दोन्ही आरोपींना प्रत्येकी १ लाख रुपयांचा जामीनदार सादर करण्याचे आदेश दिले. तसेच, त्यांना महिन्यातून एकदा संबंधित पोलीस ठाण्यात हजेरी लावण्याचे आणि प्रकरणातील पुराव्यांशी छेडछाड न करण्याचे निर्देश दिले आहेत. गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमधील कॉन्सर्टमध्ये गेलेल्या दोन विद्यार्थ्यांच्या मृत्यूनंतर १३ एप्रिल रोजी सनी जैन (३१, वरिष्ठ व्यवस्थापक - लाइव्ह इव्हेंट्स) आणि बाळकृष्ण बळराम कुरुप (४६, उपाध्यक्ष - लाइव्ह इव्हेंट्स, नेस्को एक्झिबिशन्स) यांना अटक करण्यात आली होती.

आरोपींच्या जामीन अर्जातील युक्तिवाद

संगीत महोत्सवातील सुरक्षा व्यवस्थेत आमची किंवा ‘नेस्को’ कंपनीची थेट कोणतीही भूमिका नव्हती. त्यामुळे या दुर्दैवी घटनेसाठी आम्हाला जबाबदार धरता येणार नाही. सुरक्षेचे संपूर्ण काम एका त्रयस्थ संस्थेकडे सोपवण्यात आले होते. अमली पदार्थांची खरेदी, वितरण किंवा सेवन याच्याशी आमचा कोणताही संबंध जोडणारा एकही पुरावा पोलिसांकडे नाही, असे नमूद करण्यात आले.

राहुल गांधींची कॉपी करण्याचा फडणवीसांचा प्रयत्न फसला! सपकाळ यांची टीका

दिल्लीतील मंत्र्यांच्या बंगल्यांच्या देखभाल खर्चात विक्रमी वाढ

Pune : रोहित पवार यांच्या पीएच्या मुलीचा संशयास्पद मृत्यू

लोकशाहीमुळेच मुख्यमंत्रीपदापर्यंत पोचलो, देवेंद्र फडणवीसांचे प्रतिपादन; 'जेन झी'शी केला संवाद

बांगलादेशात हिंदू कुटुंबातील ४ जणांची हत्या