(संग्रहित छायाचित्र)
मुंबई

खलिस्तानवाद्यांच्या साथीदाराला ‘एनआयए’ने केली मुंबईतून अटक

खलिस्तानी दहशतवादी लखबीरसिंग ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितरसिंग ऊर्फ बाटला यांचा निकटचा साथीदार जतिंदरसिंग ऊर्फ ज्योती याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी मुंबईतून अटक केली.

Swapnil S

मुंबई : खलिस्तानी दहशतवादी लखबीरसिंग ऊर्फ लांडा आणि गँगस्टर बचितरसिंग ऊर्फ बाटला यांचा निकटचा साथीदार जतिंदरसिंग ऊर्फ ज्योती याला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) सोमवारी मुंबईतून अटक केली. पंजाब दहशतवादी कारवाया कारस्थान प्रकरणातील ही मोठी अटक आहे.

जतिंदरसिंग ऊर्फ ज्योती हा गुरदासपूरचा असून शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या बलजितसिंग ऊर्फ राणा भाई याला जुलै २०२४ मध्ये अटक करण्यात आल्यापासून तो फरार होता. एनआयएने तांत्रिक प्रयत्नाने आणि कसून शोध घेतल्यानंतर सोमवारी ज्योती याला मुंबईतून अटक केली. तो मध्य प्रदेशस्थित राणा भाईकडून शस्त्रे खरेदी करीत होता.

बब्बर खालसा इंटरनॅशनल या परदेशस्थित दहशतवादी संघटनेची स्थापना लांडा याने केली होती आणि जतिंदरसिंग हा त्या संघटनेतील एक साथीदार होता. जतिंदरसिंग हा लांडा आणि बाटलाच्या दहशतवाद्यांना शस्त्रे पुरवत होता, असे एनआयएने म्हटले आहे. जतिंदरसिंग याने मध्य प्रदेशातून १० पिस्तुले आणली होती आणि ती लांडा आणि बाटला यांना पुरविली होती, असेही तपासात आढळले आहे.

मध्य प्रदेशातून आणखी शस्त्रे आणून त्यांची पंजाबमध्ये तस्करी करण्याची योजना त्याने आखली होती. मात्र एनआयएच्या शोधमोहिमेमुळे ही योजना फसली. जतिंदरसिंगच्या अटकेमुळे भारतात दहशतवादी कारवाया करण्यासाठी निधी उभारण्याच्या प्रयत्नांनाही लगाम बसला आहे.

Maratha Reservation : सलग तिसऱ्या दिवशी वाहतूक विस्कळीत; CSMT परिसरात आंदोलकांचे बस्तान

Maratha Reservation: आंदोलनाची धग वाढणार; मनोज जरांगे आजपासून पाणी पिणेही बंद करणार; एकतर विजययात्रा, नाहीतर अंत्ययात्रा

Maratha Reservation : दक्षिण मुंबईत आज पुन्हा कोंडीची शक्यता

Maratha Reservation : CSMT परिसरात अस्वच्छता; राज्यभरातून अन्नपदार्थांचा ओघ वाढल्याने नासाडी

Maratha reservation protest : सुप्रिया सुळेंना आंदोलकांचा घेराव; गाडीवर बाटल्या भिरकावल्या