मुंबई

नऊ वर्षांच्या मुलीला आईकडून चटके; अंथरूण ओले केले म्हणून अत्याचार; गुन्हा दाखल

रविवारी तिच्या नऊ वर्षांच्या मुलीने झोपेतच अंथरूणात लघवी केली होती. त्यामुळे रागाच्या भरात तिने तिला मारहाण करून गरम पळीने तिच्या गुप्त भागावर चटके दिले होते. त्यामुळे...

Swapnil S

मुंबई : आपल्याच नऊ वर्षांच्या अल्पवयीन मुलीला जन्मदात्या आईनेच चटके दिल्याची घटना गोवंडी परिसरात घडली. याप्रकरणी आरोपी आईविरुद्ध शिवाजीनगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. झोपेत अंथरुण ओले केले म्हणून तिने मुलीवर अत्याचार केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.

रविवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनेने स्थानिक रहिवाशांमध्ये संतापाची प्रचंड लाट उसळली. आरोपी महिला ही गोवंडीतील बैंगनवाडीत तिच्या दुसऱ्या पती आणि चार मुलांसोबत राहते. तिला पहिल्या पतीपासून चार मुली तर दुसऱ्या पतीपासून एक मुलगा आणि एक मुलगी आहे. रविवारी तिच्या नऊ वर्षांच्या मुलीने झोपेतच अंथरूणात लघवी केली होती. त्यामुळे रागाच्या भरात तिने तिला मारहाण करून गरम पळीने तिच्या गुप्त भागावर चटके दिले होते. त्यामुळे ही मुलगी जोरजोरात रडत होती. तिचा आवाज ऐकल्यानंतर स्थानिक रहिवासी तिथे जमा झाले होते. हा प्रकार समजताच तिच्या शेजारी राहणाऱ्या एका व्यक्तीने ही माहिती पोलिसांना सांगितली.

या माहितीनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. यावेळी स्थानिक रहिवाशांनी घडलेला प्रकार पोलिसांना सांगून आरोपी महिलेविरुद्ध तक्रार केली होती. त्यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी आईविरुद्ध भारतीय न्यास संहितासह अल्पवयीन न्याय कायदा कलमांतर्गत गुन्हा दाखल केला होता. गुन्हा दाखल होताच आरोपी महिलेस पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. गरम चटके दिल्याने या मुलीच्या मांडीला आणि पाठीला दुखापत झाली होती. तिच्यावर जवळच्या शासकीय रुग्णालयात औषधोपचार करण्यात आले आहे. तपासात ही महिला तिच्या मुलांना सतत क्षुल्लक कारणावरून सतत मारहाण करत असल्याचा आरोप स्थानिक रहिवाशांनी पोलिसांकडे केला आहे.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी