राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु असताना लव्ह जिहादच्या मुद्द्यावरून अबू आझमी विरुद्ध भाजप हा वाद अधिवेशनात पाहायला मिळाला. आज भाजप आमदार नितेश राणे आणि समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी यांच्यामध्ये अधिवेशनाबाहेर म्हणजेच विधानभवनाच्या परिसरात पाहायला मिळाला. या दोघांमध्ये या मुद्द्यावर जोरदार घमासान पाहायला मिळाले.
आज प्रसारमाध्यमांसमोर बोलताना नितेश राणे यांनी ग्रीन झोनमध्ये मदरसा उभारले जात असल्याची तक्रार आमदार अबू आझमींकडे केली. तसेच, "त्यांच्यावर कारवाई करण्यास गेलेल्यांवर हत्यारे काढली जातात, तुम्ही माझ्यासोबत चला दाखवतो," असे आव्हान त्यांनी केले. यावर अबू आझमींनी, "कोणत्याही धर्माचे असले तरी अनधिकृत बांधकाम तोडले पाहिजे," असे मत मांडले. "हे सर्व खोटे असून, मी कधीही तुमच्यासोबत येऊ शकतो, पण हे सर्व खोटे आहे." असे मत त्यांनी मांडले. त्यानंतर नितेश राणेंनी लव्ह जिहादचा मुद्दा उपस्थित केला. "तिकडे गेल्यावर तुम्हालाही लव्ह जिहाद असते हे मान्य करावे लागेल, हे माझे तुम्हाला आव्हान आहे," असे नितेश राणे म्हणाले. "यावर मी तुम्हाला हे सर्व खोटे आहे, हे सांगायला ५० जागी घेऊन जाऊ शकतो," असे आव्हान अबू आझमींनी केले.