मुंबई

समान कल्पनांवर कॉपीराईटचा दावा नाही; उच्च न्यायालयाचा निर्णय

चित्रपटांमधील समान कल्पनांवर कॉपीराईटचा दावा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. बालाजी टेलिफिल्म्सला ‘ड्रीम गर्ल २’ नावाच्या चित्रपटाचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश द्या, अशी मागणी एका याचिकेतून केली होती. त्याची नोंद घेताना न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

Swapnil S

मुंबई : चित्रपटांमधील समान कल्पनांवर कॉपीराईटचा दावा करता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला आहे. बालाजी टेलिफिल्म्सला ‘ड्रीम गर्ल २’ नावाच्या चित्रपटाचा गैरफायदा घेण्यापासून रोखण्यासाठी मनाई आदेश द्या, अशी मागणी एका याचिकेतून केली होती. त्याची नोंद घेताना न्यायमूर्ती रियाज छागला यांच्या एकलपीठाने हा निर्णय दिला.

बालाजी टेलिफिल्म्सने ‘ड्रीम गर्ल २’ चित्रपटाच्या माध्यमातून ‘कल किसने देखा’ या पटकथेचा उपयोग केला, असा आरोप करीत अशीम बागची यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

संबंधित पटकथा ‘द शो मस्ट गो ऑन’ म्हणून पुन्हा नोंदणीकृत करण्यात आली होती, याकडे याचिकाकर्त्याने न्यायालयाचे लक्ष वेधले होते. तथापि, याचिकाकर्त्याचा हा दावा न्यायमूर्ती छागला यांनी अमान्य केला. प्रतिस्पर्धीची कामे पूर्णपणे वेगळी असल्याचे व विश्वासघाताचा दावा दूरगामी असल्याचे आढळून येत आहे. केवळ समान कल्पना असल्याच्या कारणावरून कुणी कॉपीराईटचा दावा करू शकत नाही, असे निरीक्षण न्यायालयाने नोंदविले आणि याचिका फेटाळून लावली. याचिकाकर्त्याला प्रतिवादींना कायदेशीर खर्चाची भरपाई करण्याचे आदेश दिले. सामान्य कल्पना, दृश्य आदी घटकांवर याचिकाकर्ता मक्तेदारी मागत होता. अशा घटकांमध्ये सुरुवातीपासून कॉपीराइट अस्तित्वात नव्हता, असे न्यायालयाने नमूद केले.

याचिकाकर्त्याचा दावा

याचिकाकर्त्याने दावा केला की, त्यांची स्क्रीप्ट कॉपीराइट कायदा, १९५७ च्या तरतुदीनुसार मूळ साहित्यकृती होती. त्यांच्या स्क्रीप्टमधील मजकूरदेखील गोपनीय होता. आपण गोपनीयता बाळगण्याच्या सक्त अटींनुसार तो मजकूर शेअर केला होता, असे याचिकाकर्त्याने म्हटले. हा युक्तिवादही न्यायालयाने अमान्य केला.

Traffic Challan : ई-चलन भरलं नाही तर वीज बिलात जोडणार दंडाची रक्कम? सर्वोच्च न्यायालयाचा मोठा इशारा

२ हजारांवरील UPI पेमेंट शुल्काला स्थगिती देण्यास SC चा नकार; केंद्रासह RBI लाही नोटीस

मोठी बातमी! CJP च्या आंदोलनाला मुंबई पोलिसांनी नाकारली परवानगी; अभिजीत दिपकेंकडून २ ऑक्टोबरला 'जेल भरो'ची घोषणा

आई धावत मागे आली, पण क्षणात होत्याचं नव्हतं! स्कॉर्पिओने ३ वर्षांच्या चिमुकल्याला चिरडलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO

UMANG App : पीएफच्या कामासाठी आता EPFO ऑफिसच्या फेऱ्या नको! घरबसल्या करता येतील ही १० महत्त्वाची कामं