Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील ‘नॉईज बॅरिअर’ कोसळले; उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच दुर्घटना 
मुंबई

Mumbai : मृणालताई गोरे उड्डाणपुलावरील ‘नॉईज बॅरिअर’ कोसळले; उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच दुर्घटना

मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल ६ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, शुक्रवारी पहाटे उड्डाणपुलावरील दोन ‘नॉईज बॅरिअर पॅनेल’ कोसळल्याची घटना घडली. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच ही घटना घडल्याने पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Swapnil S

मुंबई : मृणालताई गोरे विस्तारीत उड्डाणपूल ६ जून रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. मात्र, शुक्रवारी पहाटे उड्डाणपुलावरील दोन ‘नॉईज बॅरिअर पॅनेल’ कोसळल्याची घटना घडली. उड्डाणपुलाच्या उद्घाटनानंतर अवघ्या दोन आठवड्यांतच ही घटना घडल्याने पुलाच्या सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

अंधेरी येथील रिलिफ रोड जंक्शनजवळ उड्डाणपुलाच्या उताराच्या भागात ही घटना घडली. महापालिका अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुरूम वाहून नेणारा एक डंपर भरधाव वेगात जात असताना प्रथम दुभाजकावर आदळला. त्यानंतर वाहनाच्या मागील भागाने उड्डाणपुलावरील नॉईज बॅरिअरला जोरदार धडक दिली. या धडकेमुळे ‘नॉईज बॅरिअर’चे दोन पॅनेल तुटून खाली रस्त्यावर कोसळले.

पुलाच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह

घटनेच्या वेळी पुलाखाली कोणतेही वाहन किंवा पादचारी नसल्याने मोठी दुर्घटना टळली. मात्र, नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपुलावरील संरक्षक सुविधांच्या टिकाऊपणाबाबत आणि जड वाहनांच्या वाहतुकीवरील नियंत्रणाबाबत प्रश्न उपस्थित होत आहेत. घटनेनंतर महापालिका आणि वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी केली. नुकसानग्रस्त पॅनेल हटवून परिसर सुरक्षित करण्यात आला असून डंपर चालकाविरोधात पुढील कारवाईची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

रेरा कायदा कंत्राट कायद्यापेक्षा अधिक प्रभावी; घराचा ताबा देण्यास उशीर झाल्यास खरेदीदाराला दरमहा व्याज दिलेच पाहिजे, HC चा विकासकाला झटका

निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप

BEST संपाने मुंबईकरांचे हाल! केवळ ४८ बसेस रस्त्यावर

BEST Strike : रिक्षाला लाईन, मेट्रोमध्ये मोठी गर्दी; बेस्ट संपाचा प्रवाशांना फटका