मुंबई

कल्याणमध्ये परप्रांतीयांची पुन्हा दादागिरी; चिमुरडीच्या विनयभंगाचा जाब विचारणाऱ्या मराठी कुटुंबास मारहाण

कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच एका परप्रांतीयाने आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे.

Swapnil S

कल्याण : कल्याणमध्ये दोन दिवसांपूर्वीच एका परप्रांतीय अधिकाऱ्याने मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच एका परप्रांतीयाने आणखी एका मराठी कुटुंबाला मारहाण केल्याची घटना घडल्याने खळबळ उडाली आहे. याप्रकरणी मानपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एका नऊ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर मराठी कुटुंबाने जाब विचारला असता परप्रांतीय पांडे कुटुंबाने या मराठी कुटुंबाला मारहाण केली. याप्रकरणी पांडे पती-पत्नीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पांडे पती पत्नीच्या मारहाणीत एक मराठी तरुण जखमी झाला आहे. या तरुणाच्या पत्नीला आणि आईलाही या दोघांनी मारहाण केली. ही संपूर्ण घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे.

या घटनेची माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, मानपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका इमारतीत दोन कुटुंबामध्ये वाद निर्माण झाला होता. मुलांच्या खेळण्यावरुन हा वाद झाला. त्यामध्ये एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, अशी तक्रार तिच्या आई-वडिलांनी केली. आम्ही पीडित मुलीच्या आई-वडिलांच्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या आई-वडिलांनी पांडे कुटुंबाला जाब विचारला असता त्या कुटुंबाने मारहाण केली. पांडे पती-पत्नीच्या विरोधात आम्ही तक्रारीनंतर गुन्हा दाखल केला आहे.

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!

कर्नाटकमधील सिद्धरामय्या सरकारला हायकोर्टाचा दणका; ‘आरएसएस’ला लक्ष्य करण्याच्या निर्णयाला स्थगिती