मुंबई

नोरा फतेची ‘ईडी’ कडून तब्बल सहा तास कसून चौकशी

प्रतिनिधी

तिहार तुरुंगात असलेल्या सुकेश चंद्रशेखर याच्याशी संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणात अभिनेत्री आणि नृत्यांगना नोरा फतेही हिची दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने चौकशी केली आहे. २०० कोटींच्या मनीलाँड्रिंग प्रकरणात आरोपी सुकेश चंद्रशेखरने नोरा फतेही आणि जॅकलिन फर्नांडिस यांना आलिशान कारसह अनेक महागड्या भेटवस्तू दिल्या होत्या, असे ‘ईडी’च्या तपासात आढळले आहे.

नोरा फतेही हिची पोलिसांनी चौथ्यांदा तब्बल सहा तास कसून चौकशी केली. तिला ५० प्रश्न विचारण्यात आले होते. यात सुकेशकडून भेटवस्तू कधी घेतल्या? तू त्याला कुठे भेटली? असे काही प्रश्न होते. संपूर्ण चौकशीत नोराने पोलिसांना सहकार्य केले. याप्रकरणी तीन दिवसांपूर्वी बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला समन्स बजावले आहे. आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी जॅकलिन फर्नांडिसला २६ सप्टेंबर रोजी दिल्लीच्या पतियाळा न्यायालयात हजर राहावे लागणार आहे.

‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रानंतर जॅकलिनला समन्स बजावण्यात आले असून, आर्थिक गैरव्यवहाराचा सूत्रधार सुकेश चंद्रशेखर याच्यासमवेत तिचे कसे संबंध होते आणि २०० कोटी रुपयांपेक्षा अधिक गैरव्यवहारात आपली भूमिका काय होती, हे जॅकलिनला न्यायालयाला सांगावे लागणार आहे. याप्रकरणी नुकत्याच दाखल करण्यात आलेल्या पुरवणी आरोपपत्राचीही न्यायालयाने दखल घेतली आहे. ‘ईडी’ने दाखल केलेल्या आरोपपत्रात नवीन खुलासे समोर येत आहेत. या प्रकरणातील मुख्य आरोपी सुकेश चंद्रशेखर याने जॅकलिनला घोडा, मांजरी आणि दागिनेच भेट दिल्याचे आपल्याला माहिती आहे; पण सुकेश याने तिच्यासाठी श्रीलंकेत घरही खरेदी केले होते, अशी माहिती समोर आली आहे. सुकेशविरोधात खटला सुरू आहे.

कोविशिल्डमुळे गंभीर आजार झाल्यास नुकसानभरपाई मिळावी; सुप्रीम कोर्टात याचिका दाखल

ऑस्ट्रेलियाची दोन भारतीय हेरांवर कारवाई

'इम्पॅक्ट प्लेयर' नियमामुळे रिंकूने स्थान गमावले; बीसीसीआयच्या पदाधिकाऱ्याचा संघ निवडीबाबत गौप्यस्फोट

Video: देशातील पहिली Vande Bharat Metro तयार, 'या' मार्गांवर सुरु होणार सेवा

चॅम्पियन्स करंडक स्पर्धेच्या आयोजनावर पाकिस्तान ठाम