मुंबई

सोमैया महाविद्यालयाला मुंबई विद्यापीठाने बजावली कारणे दाखवा नोटीस; विद्यार्थ्यांकडून घेतले होते अतिरिक्त शुल्क

राज्य सरकारकडून अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे अधिक शिक्षण शुल्क घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाकडे कारवाईची मागणी केली होती.

Swapnil S

मुंबई : राज्य सरकारकडून अनुदान मिळत असतानाही विद्यार्थ्यांकडून अनधिकृतपणे अधिक शिक्षण शुल्क घेतल्याप्रकरणी महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या शिष्टमंडळाने विद्यापीठाकडे कारवाईची मागणी केली होती. त्यानुसार विद्यापीठाने सोमैया महाविद्यालयाला कारणे दाखवा नोटीस बजावली आहे.

घाटकोपर येथील सोमैया महाविद्यालय मुंबई विद्यापीठाशी संलग्न आहे. विद्यापीठाने ठरवून दिलेल्या नियमाप्रमाणे विद्यार्थांकडून शुल्क आकारणे बंधनकारक असताना विद्यार्थ्यांकडून अतिरिक्त शुल्क घेण्यात आल्याची तक्रार मनविसेने केली होती. त्यानुसार विद्यापीठाने महाविद्यालयाला विद्यार्थ्याकडून अनधिकृतपणे वाढीव शिक्षण शुल्क घेतल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मनविसेच्या शिष्टमंडळाने तिन्ही महाविद्यालयाच्या प्राचार्यांच्या दालनात धडक देऊन वाढीव शुल्क घेतल्याबद्दल जाब विचारला होता.

राज्य शासन व विद्यापीठाच्या परवानगीशिवाय अतिरिक्त शुल्क घेणे हा भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहिता अंतर्गत फौजदारी गुन्हा आहे. वसूल केलेले अधिकचे शिक्षण शुल्क तातडीने रद्द करून विद्यार्थ्यांना परत करावे व महाराष्ट्रातील भूमिपुत्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांकडून मुंबई विद्यापीठाने ठरवून दिलेल्या शिक्षण शुल्क आकारावे. - संतोष गांगुर्डे, राज्य प्रमुख संघटक, मनविसे
- संतोष गांगुर्डे, राज्य प्रमुख संघटक, मनविसे

मविआचा महानिक्काल, महायुतीच लाडकी; महायुतीला २३६ जागा, तर मविआला केवळ ४९ जागा

‘लाडकी बहीण’ योजना ठरली गेमचेंजर; देवेंद्र फडणवीस हेच मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार

सावत्र भावांना बहिणींनी जोडा दाखवला - मुख्यमंत्री

तुष्टीकरणाला उत्तर कसे द्यायचे हे महाराष्ट्राने दाखवले - मोदी

निकाल हा अनपेक्षित आणि अनाकलनीय - उद्धव ठाकरे