कुख्यात गुंड डीके रावला खंडणी प्रकरणात अटक, मुंबई गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई 
मुंबई

कुख्यात गुंड डी. के. रावला खंडणी प्रकरणात अटक, मुंबई गुन्हे शाखा पोलिसांची कारवाई

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात गुंड डी. के. रावसह सात आरोपींना अटक केली आहे. एका हॉटेल चालकाला 2.5 कोटींच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

Kkhushi Niramish

मुंबई गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी पथकाने कुख्यात खंडणीखोर डी. के. रावसह सात आरोपींना अटक केली आहे. एका हॉटेल चालकाला 2.5 कोटींच्या खंडणीची मागणी करून खंडणी न मिळाल्यास जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, एका हॉटेल चालकाला गुंड डी. के. राव आणि त्याच्या अन्य सहा साथीदारांनी 2.5 कोटी रुपयांची खंडणी मागितली होती. खंडणी न मिळाल्यास हॉटेल ताब्यात घेऊन त्याला हॉटेल चालकाला जीवे मारण्याची धमकी दिल्याची तक्रार मुंबईतील गुन्हे शाखेच्या खंडणीविरोधी पथकाकडे करण्यात आली होती.

यावर तातडीने कारवाई करत मुंबई पोलिसांनी गुंड डी.के.रावसह त्याच्या सर्व अन्य सहा साथीदारांना अटक केली आहे. भारतीय न्याय संहितेच्या संबंधित कलमानुसार एफआयआर दाखल करण्यात आला आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास