मुंबई

बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न

प्रतिनिधी

बाप्पाच्या आगमनाला फक्त १३ दिवस शिल्लक असून यंदा गणेशोत्सव धुमधडाक्यात साजरा करता येणार आहे. मात्र बाप्पाच्या विसर्जनासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत धोकादायक पुलांचे विघ्न समोर आले आहे. १३ धोकादायक पुलांची यादीच पालिकेने जाहीर केली असून हे पूल धोकादायक ठरु शकते, असा इशारा दिला आहे. त्यामुळे बाप्पाच्या विसर्जनावेळी धोकादायक पुलांवरुन योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन पालिकेच्या पूल विभागाने केले आहे.

अंधेरीत ३ जुलै, २०१८ रोजी गोखले पूल कोसळून दोन जणांचा आणि १४ मार्च २०१९ रोजी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथील ‘हिमालय’ पूल कोसळून झालेल्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर मुंबईतील पुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. त्यामुळे पालिकेने मुंबईतील सर्व सुमारे ३४४ पुलांचे नव्याने स्ट्रक्चरल ऑडिट करून आवश्यक छोटी-मोठी दुरुस्ती तर अतिधोकादायक पूल पाडून नव्याने बांधण्याचे धोरण आखले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात धोकादायक पुलांवर गर्दी होऊन दुर्घटना होऊ नये यासाठी धोकादाय पुलांची यादी जाहीर केली आहे. पालिका आणि पोलिसांनी दिलेल्या सुचनेनुसारच या पुलांवरून ये-जा करावी असे निर्देशही पालिकेने दिले आहेत.

पुणे विमानतळावर अपघात; 'टग ट्रॅक्टर'ला धडकले एअर इंडियाचे १८० प्रवाशांनी भरलेले विमान

गोल्डन चान्स! या फेमस Electric Scooter वर मिळतोय तब्बल १० हजार रुपयांपर्यंतचा डिस्काउंट, जाणून घ्या डिटेल्स

फक्त ६५ हजारात मिळतीये Electric Scooter, चालवण्यासाठी लायसन्सचीही गरज नाही; जाणून घ्या रेंज अन् किंमत

कार्तिक आर्यनच्या नातलगांचा घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेत मृत्यू, मुंबईत झाले अंत्यसंस्कार

होर्डिंग पॉलिसी लवकरच, तोपर्यंत नवीन होर्डिंगना परवानगी नाही