ओमराजेंचे ठरले! शिंदे गटात जाणार; ‘ऑपरेशन टायगर’ला गती मिळणार; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का  
मुंबई

ओमराजेंचे ठरले! शिंदे गटात जाणार; ‘ऑपरेशन टायगर’ला गती मिळणार; उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का

उबाठाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे तळ्यात मळ्यात अखेर संपले असून त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे रविवारी संध्याकाळी जाहीर केले आहे. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’बाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. निंबाळकर यांच्या शिंदे सेनेत जाण्याने उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

Swapnil S

धाराशिव : उबाठाचे धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे तळ्यात मळ्यात अखेर संपले असून त्यांनी शिंदे सेनेत प्रवेश करणार असल्याचे रविवारी संध्याकाळी जाहीर केले आहे. यामुळे ‘ऑपरेशन टायगर’बाबत निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. निंबाळकर यांच्या शिंदे सेनेत जाण्याने उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांना धक्का बसला आहे.

पवनराजे हत्याकांडाचा निकाल विरोधात गेल्यानंतर पवनराजे यांचे पुत्र ओम राजे शनिवारी निराश झाले होते. शिंदे सेनेत जायचे की उबाठात राहायचे याबाबत ते द्विधा मनस्थितीत असल्याच्या चर्चा होत्या. यातच दोन दिवसांत आपण कार्यकर्त्यांशी बोलून भूमिका जाहीर करणार असल्याचे ओमराजे यांनी सांगितले होते.

धाराशिवमधील गोवर्धनवाडी येथील गावात ओमराजे यांनी मतदारसंघातील सर्वच तालुक्यातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांना बोलावले होते. या कार्यकर्त्यांशी ओमराजेंनी बंद दाराआड चर्चा केली. त्यानंतर रात्रौ ८ वाजण्याच्या सुमारास निंबाळकर यांनी आपली भूमिका स्पष्ट केली.

ते म्हणाले की, ‘नुकत्याच झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत आम्ही लढत असतानाही धाराशीव लोकसभा मतदारसंघाचा विचार केला. आम्हाला एकाही पंचायत समितीत यश मिळाले नाही. सामान्य कार्यकर्ते वाईट पद्धतीने पराभूत झाले. त्याची कारणे आम्हाला कळत नाहीत. त्यामुळेच आम्ही एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली काम करणार आहोत, असे ते म्हणाले.

शिंदेंच्या सेनेचे आमदार तानाजी सावंत हेही गोवर्धनवाडी येथे पोहोचले. ओमराजे निंबाळकर शिवसेनेमध्ये येणार आहेत, विकासाच्या दृष्टीने ओमराजे निंबाळकर निर्णय घेणार आहेत, असा गौप्यस्फोटच त्यांनी केला. भाजप आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांचे जिल्ह्यातील वाढते प्रस्थ, सत्ता नसल्याने निधीसाठी होत असलेली कसरत, त्या पार्श्वभूमीवर ओमराजेंनी सत्तेत जाण्याचा निर्णय घेतला आहे. सत्तेत गेल्याशिवाय लोकांची काम करता येणार नाही, असे स्पष्टीकरण ओमराजे यांनी केले.

तानाजी सावंत यांच्यावर जबाबदारी

‘ऑपरेशन टायगर’ मध्ये ओमराजे निंबाळकर यांची जबाबदारी तानाजी सावंत यांच्यावर दिल्याची चर्चा होती. तानाजी सावंत यांनी याबाबत दुजोरा दिला. तसेच, पवनराजे निंबाळकर हत्याप्रकरणी कोर्टाचा निर्णय झाला. माझे ओमराजे यांच्याशी कौटुंबिक संबंध असल्याने आपण त्यांची भेट घेण्यासाठी आल्याचे तानाजी सावंत यांनी स्पष्ट केले.

राजकारण कराल तर राजकीय उत्तर मिळेल; मुख्यमंत्री फडणवीस यांचा विरोधकांना इशारा; विधिमंडळ अधिवेशन आजपासून

महायुतीचे सरकार विश्वासघातकी; विरोधी पक्षाची जळजळीत टीका, सरकारच्या चहापानावर बहिष्कार

योगामुळे चिरतरुण राहता येते - नरेंद्र मोदी

Mumbai : रविवारी बेस्टची एकही बस धावली नाही

Mumbai : पाऊस आला आणि गेलाही!