मुंबई

शिवडीत उघड्या गटारात पडून एकाचा मृत्यू; चार कामगार जखमी, एकाची प्रकृती गंभीर

Swapnil S

मुंबई : उघड्या गटारात खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार पडल्याची घटना शनिवारी मध्यरात्री २.४९ वाजता शिवडी वाडी बंदर येथे घडली. या दुर्घटनेत उघड्या गटारातील गॅसमुळे गुदमरुन मेहबूब इस्माईल (१९) या कामगाराचा मृत्यू झाला असून उर्वरित चार कामगारांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले. यापैकी एकाची प्रकृती गंभीर असल्याचे पालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन नियंत्रण कक्षाकडून सांगण्यात आले.

हाजी बंदर रोड, एल अँड टी गेट नंबर १, रुपजी कानजी चाळ, शिवडी येथे खाजगी कंत्राटदाराचे पाच कामगार उघड्या गटारात पडले. बॉक्स ड्रेनचे काम सुरू असताना ही घटना घडली. यात मेहबूब इस्माईल (१९) याचा मृत्यू झाला. तर सलीम (२५) याची प्रकृती गंभीर असल्याचे केईएम रुग्णालयाकडून सांगण्यात आले. शफाकूल (२२), कोरेम (३५) व मोसलेन (३०) या तिघांची प्रकृती स्थिर असून त्यांना उपचारासाठी केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

दरम्यान, या घटनेची चौकशी सुरू असून अहवाल प्राप्त झाल्यानंतर योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कामाच्या ठिकाणी व्हीजिट होणे गरजेचे!

मुंबई महापालिकेच्या माध्यमातून विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. जलवाहिनी टाकणे, पर्जन्य जलवाहिनी बदलणे, रस्त्यांची, नालेसफाईची अशी कामे सुरू असून काही वेळा कंत्राटदाराच्या निष्काळजीपणामुळे दुर्घटना घडतात. त्यामुळे ज्या-ज्या ठिकाणी कामे सुरू आहेत, अशा ठिकाणी पालिकेच्या वॉर्ड स्तरावरील संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी व्हीजिट करणे गरजेचे आहे. जेणेकरुन दुर्घटना टळली जाऊ शकते, असे मत उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे माजी नगरसेवक सचिन पडवळ यांनी व्यक्त केले.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल