मुंबई

दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी मिळणार एक महिन्यांची मुदत

प्रतिनिधी

महापालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मार्ताहीचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर येण्याची चिन्हे आहेत. दुकाने आणि आस्थापनांच्या पाट्या मराठीत करण्यासाठी एक महिन्यांची मुदत शासनाच्या वतीने देण्यात आली असून या माध्यमातून शिवसेना पुन्हा मराठी मुद्दा आपल्याकडे ठेवण्याची शक्यता आहे.

एक महिन्याच्या मुदतीत दुकानांच्या पाट्या बदलल्या नाहीत, तर कारवाई करण्यात येईल, असा स्पष्ट इशारा मराठी भाषा मंत्री सुभाष देसाई यांनी मंगळवारी दिला. दुकाने-आस्थापनांच्या पाटी-बोर्डाच्या आकारपैकी पन्नास टक्के जागेत मराठी भाषेत नाव प्राधान्याने लिहावे लागेल. मग उर्वरीत जागेत इतर भाषेचा वापर करता येईल. अन्यथा कारवाई होणार आहे.

दुकाने व आस्थापनांवरील पाट्या मराठीत करण्याच्या दृष्टीने प्रथम सर्व दुकानदारांना आवाहन करण्यासाठी स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य घेण्यात येणार आहे. पूर्वी स्पष्ट नियम नसल्याने दुकानदार पळवाटा काढत होते. पण विधिमंडळात कायदा केल्याने आता मराठीत भाषेत पाट्या करण्याचा नियम झाला आहे.

- सुभाष देसाई, मराठी भाषा मंत्री

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली