मुंबई

ओपीडीत आता UPI द्वारे भरता येणार पैसे, वेळेची बचत होण्यासाठी नवीन सुविधा

पालिका रुग्णालयांतील ओपीडी वेळेतच सुरू करावी, प्राध्यापकांसह प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली

Swapnil S

मुंबई : पालिका रुग्णालयातील ओपीडीत आल्यावर १० रुपयांच्या पावतीऐवजी आता यूपीआय ॲपद्वारे शुल्क आकारणी करण्यात येणार आहे. केईएम रुग्णालयात हा उपक्रम राबवण्यात येणार असून पुढील काही दिवसांत पालिकेच्या अन्य रुग्णालयांत हा उपक्रम राबवण्यात येईल, अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी दिली.

पालिका रुग्णालयांतील ओपीडी वेळेतच सुरू करावी, प्राध्यापकांसह प्राध्यापकांना बायोमेट्रिक हजेरी बंधनकारक करण्यात आली असून तसे आदेश डॉ. सुधाकर शिंदे यांनी नुकतेच जारी केले. ओपीडी वेळेत जरी सुरू झाली तरी केसपेपर आणि शुल्क भरण्यासाठी बरीच गर्दी सकाळी सात वाजल्यापासून रुग्णालयाच्या ओपीडीत दिसते. शुल्क भरण्याचा कालावधी कमी व्हावा, म्हणून यूपीआय स्कॅनरची सुविधा केली जाणार आहे.

अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी सांगितले की, “पालिका रुग्णालयात ओपीडीमध्ये जाण्यासाठी रुग्णाला १० रुपये शुल्क भरावे लागते. यासाठीही मोठी रांग असते. यूपीआय ॲॅपची शुल्क प्रणाली सुरू झाल्यावर जास्त वेळ शुल्क भरण्याच्या रांगेत उभे राहण्याची वेळ येणार नाही. यूपीआय ॲॅपच्या माध्यमातून शुल्क स्वीकारले जाऊ शकेल. त्यासाठी काही कर्मचाऱ्यांनाच रांगेच्या बाहेर यूपीआय स्कॅनर घेऊन उभे केले जाईल. ते ओपीडीत आलेल्या रुग्णांकडे जातील आणि यूपीआयच्या माध्यमातून शुल्क जमा करतील, असेही डॉ. शिंदे यांनी सांगितले.

लाडक्या बहिणींना ई-केवायसी बंधनकारक; योजनेसाठी पारदर्शकतेला प्राधान्य देणार - अदिती तटकरे

मल्याळम सुपरस्टार मोहनलाल यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर; ४०० हून अधिक चित्रपटांत उमटवला अभिनयाचा ठसा!

Latur : लातूरमध्ये पावसाचा कहर; ४० तासांनंतर सापडले ५ जणांचे मृतदेह

पुणे-नाशिक महामार्गावर गॅस टँकरची गळती; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण

मनसेचा आज ट्रॅफिक मार्च; नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन