मुंबई

‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ यशस्वी : वर्षभरात १,०६४ मुलांची सुटका; मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाची यशस्वी कामगिरी

Swapnil S

मुंबई : कौटुंबिक समस्या, ग्लॅमरच्या दुनियेची ओढ यात आपल्या कुटुंबीयांना न सांगता घरापासून दूर जातात. अनेकदा अशी मुलं दुसऱ्या ठिकाणी जाण्यासाठी रेल्वे स्थानकात येतात. यावेळी स्थानकात तैनात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान अशा मुलांना ओळखतात आणि त्यांची समजूत काढत घरच्यांच्या सुखरुप स्वाधीन करतात. गेल्या वर्षभरात रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांनी 'ऑपरेशन नन्हे फरिश्ते' मोहिमेंतर्गत तब्बल १,०६४ मुलांना पालकांच्या स्वाधीन केले आहे.

रेल्वेची मालमत्ता, रेल्वे हद्दीत घडणाऱ्या गुन्हेगारीला आळा घालणे, प्रवाशांची सुरक्षा अशा विविध प्रकारच्या जबाबदारी रेल्वे स्थानकात तैनात रेल्वे सुरक्षा दलाचे जवान पार पाडतात. रेल्वे स्थानक परिसरात चोख सुरक्षा करणारे प्रशिक्षित जवान

स्थानकात अशा मुलांचा शोध घेत त्यांना कुटुंबीयांपर्यंत सुखरूप पोहोचवता. आरपीएफच्या जवानांनी “ऑपरेशन नन्हे फरिश्ते” अंतर्गत एप्रिल २०२३ ते मार्च २०२४ या कालावधीत सरकारी रेल्वे पोलीस (जीआरपी) आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचाऱ्यांच्या समन्वयाने १०६४ मुलांची मध्य रेल्वेच्या स्टेशनवरून सुटका केली आहे. यात चाइल्डलाइनसारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांच्या पालकांशी पुनर्मीलन झालेल्या मुला-मुलींचा समावेश आहे. हे प्रशिक्षित आरपीएफ कर्मचारी मुलांशी संपर्क साधतात, त्यांच्या समस्या समजून घेतात आणि त्यांना त्यांच्या पालकांशी पुन्हा एकत्र येण्यासाठी सल्ला देतात.

विभागनिहाय मुलांची सुटका

  • मुंबई विभाग - ३१२ मुलांची सुटका

  • भुसावळ विभाग सर्वाधिक - ३१३ मुलांची सुटका

  • पुणे विभाग - २१० मुलांची सुटका

  • नागपूर विभाग - १५४ मुलांची सुटका

  • सोलापूर विभाग - ७५ मुलांची सुटका

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

कार देणार बाईकएवढं मायलेज! 'ही' CNG कार लवकरच होतीये लॉन्च, किती असेल किंमत?

LICची 'एक नंबर' स्कीम; छोटी रक्कम गुंतवून मिळेल लाखोंचा फायदा