ऑरेंज गेट- मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगदा  छायाचित्र : MMRDA
मुंबई

ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह बोगद्याच्या कामाला गती; डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट, केंद्राकडून ६८ कोटींचा निधी उपलब्ध

सन २०२५-२६ च्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत विशेष सहाय्य (कर्ज) च्या भाग-१ अंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी २०० कोटींच्या निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता

Swapnil S

मुंबई : मुंबईतील वाहतूककोंडी फोडण्यासह जलद प्रवासासाठी ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह दुहेरी बोगद्याचे काम हाती घेतले आहे. डिसेंबर २०२८ पर्यंत काम पूर्ण करण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट असून केंद्र सरकारने या कामासाठी ६८ कोटींचा निधी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करून दिला आहे.

सन २०२५-२६ च्या भांडवली गुंतवणुकीसाठी राज्यांना विशेष सहाय्य योजनेंतर्गत विशेष सहाय्य (कर्ज) च्या भाग-१ अंतर्गत ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी २०० कोटींच्या निधी उपलब्ध करून देण्याचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सादर करण्यात आला होता.

त्यानुसार केंद्र सरकारने ऑरेंज गेट ते मरीन ड्राइव्ह भुयारी मार्ग प्रकल्पासाठी एकूण २०० कोटींचा निधी मंजूर केला असून मंजूर रकमेपैकी ६८ कोटींचा निधी उपलब्ध करून दिला आहे.

बिनव्याजी कर्ज

भुयारी मार्गाचे बांधकामासाठी १३५४.६६ कोटी रकमेचे बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करून देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाच्या मंजूर वित्तीय आराखड्यानुसार प्रकल्पावरील केंद्रीय कराच्या ५० टक्के रक्कम ३०७.२२ कोटी, राज्यस्तरीय करांसाठी ६१४.४४ कोटी आणि खासगी व सरकारी जमीन कायमस्वरूपी व तात्पुरत्या स्वरूपातील जागा उपलब्ध करून देण्याबाबतचा खर्चाची तरतूद ४३३ कोटी असे एकूण १३५४.६६ कोटी बिनव्याजी दुय्यम कर्ज सहाय्य राज्य सरकारकडून मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाला उपलब्ध करून द्यायचे आहे.

व्हिएतनाममध्ये भारतीय पर्यटकांची बोट उलटली; बचावकार्य युद्धपातळीवर, दूतावासाकडून हेल्पलाइन सुरू

PF खातेधारकांनो लक्ष द्या! UAN सक्रिय नसेल तर EPFO च्या अनेक सुविधा वापरता येणार नाहीत; 'या' स्टेप्स फॉलो करा

बेसमेंटमध्ये विवस्त्र अवस्थेत आढळला ७ वर्षीय चिमुरडीचा मृतदेह; अत्याचारानंतर हत्येचा आरोप

Swiggy Instamart अडचणीत; मुदत संपलेल्या आणि खराब झालेल्या अन्नपदार्थांच्या तक्रारींवर FSSAI ची कारवाई

प्रायव्हसीवरून वाद वाढताच मेटाचा यू-टर्न! इंस्टाग्रामवरील 'Muse Image' AI फीचर बंद