मुंबई : शैक्षणिक दर्जा उंचावण्यासाठी काॅपीमुक्त वातावरणात परीक्षा होणे गरजेचे आहे. यासाठी शाळांमध्ये सोयीसुविधा उपलब्ध करत त्याचा आढावा घेण्यासाठी शिक्षणाधिकाऱ्यांनी आठवड्यात एकदा शाळांना भेट द्या आणि वेळोवेळी अहवाल सादर करा. १० वी १२ वीच्या परीक्षा काॅपीमुक्तीसाठी यंत्रणांनी दक्ष राहावे, असे आदेश शालेय शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी शिक्षण विभागाला दिले.
शालेय शिक्षण विभागाकडील योजना, उपक्रम कार्यक्रम मिशन मोडवर राबवावेत. यामध्ये १०० दिवसांचा कार्यक्रम, नवीन शैक्षणिक धोरण व आरटीआयची प्रवेश प्रक्रिया वेळेत पूर्ण करावी, अशा सूचनामंत्री दादा भुसे यांनी शालेय शिक्षण विभागाच्या आढावा बैठकीत दिल्या.
शिक्षकांनी विद्यार्थ्यांना कॉपीपासून दूर राहण्यासाठी मार्गदर्शन करावे. कॉपीमुक्त परीक्षा देण्यासाठी विद्यार्थ्यांना प्रेरित करावे. यासाठी आवश्यकउपाय करावेत, अशा सूचना भुसे यांनी दिल्या.