पावसाळा सुरु होण्याआधीच पावसाळ्यात उद्भवणारे साथीच्या रोगांनी मुंबई पाउल टाकले आहे. जून महिन्याच्या पहिल्या ५ दिवसांत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रोचे रुग्ण आढळल्याने मुंबईत आजाराचा धोका वाढला आहे.
कोरोनाच्या चौथ्या लाटेसह मुंबईत मलेरिया - ५७, गॅस्ट्रो - ७८, कावीळचे १५ रुग्ण आढळल्याने पालिकेच्या चिंतेत भर पडली आहे. दरम्यान, वांद्रे पूर्व - पश्चिम व भायखळ्यात गॅस्ट्रोचे सर्वाधिक रुग्ण आढळले असून वरळी, प्रभादेवी परिसरात मलेरियाचे रुग्ण आढळले आहेत.
१ ते ५ जून पर्यंत मलेरिया, डेंग्यू, कावीळ, लेप्टो, गॅस्ट्रो हे साथीचे आजार बळावत आहेत. दरम्यान, चिकुनगुनिया व स्वाईन फ्लूचा एकही रुग्ण अद्याप सापडलेले नाही.