Palghar : लाखनपाड्यात एकाचवेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार; स्त्रियांच्या हंबरड्यांनी आणि नातेवाईकांच्या हुंदक्यांनी परिसर सुन्न 
मुंबई

Palghar : लाखनपाड्यात एकाचवेळी १२ जणांवर अंत्यसंस्कार; स्त्रियांच्या हंबरड्यांनी आणि नातेवाईकांच्या हुंदक्यांनी परिसर सुन्न

मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर मंगळवारी बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले.

Swapnil S

पालघर : मुंबई–अहमदाबाद महामार्गावर सोमवारी झालेल्या ट्रक आणि कंटेनरच्या भीषण अपघातात मृत्यू झालेल्या १३ जणांपैकी १२ जणांवर मंगळवारी बापूगाव येथील लाखनपाडा येथे एकाचवेळी अंत्यसंस्कार करण्यात आले. तर अजय चंदर अहाडी (१८) याच्यावर वांगर्जे शेंडेपाडा येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

लाखनपाड्यात आज एकाच रांगेत १२ सरणं रचण्यात आली होती. एकाच कुटुंबातील आणि जवळच्या नातेवाईकांचे मृतदेह समोर पाहून गावकऱ्यांचा आक्रोश अनावर झाला. स्त्रियांच्या हंबरड्यांनी आणि नातेवाईकांच्या हुंदक्यांनी संपूर्ण परिसर सुन्न झाला होता. बापूगावावर मंगळवारी स्मशानशांतता पसरली होती.

या अपघातात सुरेश लाखात, पांडू लाखात, काळू लाखात, सुनील दांडेकर, चिमा कुरहाडा, नमिता दांडेकर, सारिका संतोष लाखात, आयुष सीताराम लाखात, सागर शेंडे, वंदना वळवी, सलोनी शिवराम वळवी आणि रियांक्षी संतोष लाखात सर्व राहणार बापूगाव आणि अजय चंदर अहाडी यांचा मृत्यू झाला. तर वेदांत हॉस्पिटलमध्ये १७ जण उपचार घेत असून त्यापैकी ६ जण अतिदक्षता विभागात असून ११ जणांची प्रकृती स्थिर आहे.

अंत्यसंस्कारावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक उईके, खासदार हेमंत सावरा, आमदार राजेंद्र गावित, आमदार विलास तरे, आमदार विनोद निकोले आणि आमदार हरिश्चंद्र भोये यांनी गावात जाऊन पीडित कुटुंबांचे सांत्वन केले.

निष्काळजीपणामुळे मृत्यूचा सापळा?

खडकीपाडा आणि मालपाडा या पाड्यांमध्ये मिळून सुमारे ७०० ते ८०० लोकसंख्या वास्तव्यास आहे. मात्र या भागात सुरक्षित सेवा रस्ता नाही. तसेच भरणी किंवा योग्य क्रॉसिंगची व्यवस्था नसल्याने ग्रामस्थांना रोज जीव मुठीत घेऊन महामार्ग ओलांडावा लागतो.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२