मुंबई

वेळीच मालमत्ता कर भरा : कायदेशीर कारवाई टाळा; थकबाकीदारांना पालिकेचा इशारा

विहित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे हा मालमत्ता कर भरणा करण्याचा अंतिम दिवस आहे

Swapnil S

मुंबई : थकबाकीदारांनी २५ मेपर्यंत मालमत्ता कर भरावा, अन्यथा दंडात्मक कारवाईसह कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले, असा इशारा पालिका प्रशासनाने थकबाकीदारांना दिला आहे.

विहित कालावधीमध्ये मालमत्ता कर न भरणाऱ्या मालमत्ता धारकांवर पालिकेच्या कर निर्धारण व संकलन खात्याकडून लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. सन २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी २५ मे हा मालमत्ता कर भरणा करण्याचा अंतिम दिवस आहे. त्यामुळे मालमत्ताधारकांनी मुदतीपूर्वी करभरणा करून संभाव्य दंडाची कारवाई टाळावी, असे आवाहन पालिकेतर्फे करण्यात आले आहे. कर संकलन व कर आकारणी विभागाच्या वतीने कर वसुली करण्यासाठी विविध प्रकारचे प्रयत्न केले जात आहेत. समाज माध्यमांद्वारे संपर्क करून तसेच गृहनिर्माण संस्थेतील सदनिकानिहाय करवसुलीचे कामकाज कार्यरत आहे. मालमत्ताधारकांना करभरणा करण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने महानगरपालिकेच्या वतीने विविध माध्यमांतून जनजागृती व आवाहन करण्यात आले आहे.

‘टॉप टेन’ मालमत्ताधारकांची यादी

१) रिलायन्स कन्स्ट्रक्शन (जी दक्षिण विभाग)

०४ कोटी ४० लाख ६४ हजार ७१६ रूपये

२) बाबुलाल आगरवाल ॲण्ड आदर्स (पी दक्षिण विभाग) ०४ कोटी ३० लाख ४७ हजार रुपये

३) एसजीपी कम्युनिटी प्रायव्हेट लिमिटेड (एस विभाग) ०३ कोटी ७५ लाख १७ हजार ६१२ रुपये

४) अरिहंत रिॲलिएटर्स (एम पश्चिम विभाग)

०३ कोटी ५५ लाख ६३ हजार ९९३ रुपये

५) टान्सकॉन एंटरप्रायजेस (के पश्चिम विभाग)

०३ कोटी ५२ लाख ४० हजार ३७८ रुपये

६) इंडियन फार्म्यास्युटिकल असोसिएशन (एच पूर्व विभाग) ०३ कोटी ३८ लाख ६८ हजार ७१० रुपये

७) चान्द जाम योगी स्मृती (एच पश्चिम विभाग)

०३ कोटी १० लाख ८२ हजार ७८९ रुपये

८) एसजीएफ एंटरप्रायजेस (पी उत्तर विभाग)

०३ कोटी ०७ लाख ५२ हजार ६६८ रुपये

९) हेलिसिटीट रेसिडेंसी प्रायव्हेट लिमिटेड (डी विभाग) ०२ कोटी ७४ लाख ३८ हजार ९२७ रुपये

१०) श्री समर्थ स्पार्क डेव्हलपर्स (टी विभाग)

०२ कोटी ७२ लाख ७ हजार ५० रुपये

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’