Mumbai : टेरेसच्या कठड्याचा भाग कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू 
मुंबई

Mumbai : टेरेसच्या कठड्याचा भाग कोसळून पादचाऱ्याचा मृत्यू

चुनाभट्टी परिसरातील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या १७ मजली इमारतीच्या टेरेसवरील कठड्याचे (पॅरापेट वॉल) प्लास्टर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : चुनाभट्टी परिसरातील ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ या १७ मजली इमारतीच्या टेरेसवरील कठड्याचे (पॅरापेट वॉल) प्लास्टर शुक्रवारी रात्रीच्या सुमारास कोसळले. या दुर्घटनेत रस्त्यावरून जाणाऱ्या एका पादचाऱ्याचा मृत्यू झाला.

चुनाभट्टी, कुरेशी नगर येथे तळ अधिक १७ मजली ‘गॅलेक्सी अपार्टमेंट’ ही इमारत आहे. या इमारतीच्या टेरेसचा भाग शुक्रवारी मध्यरात्री रात्री १२.३९ वाजता कोसळला. यावेळी इमारतीच्या खालून जाणाऱ्या पादचाऱ्यावर टेरेसचा भाग कोसळला. या घटनेत अब्दुल वहाब (५५) हे जखमी झाले असता त्यांना उपचारासाठी सायन रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

या घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी प्रतिबंधक साधने आणि बांबूंच्या सहाय्याने इमारतीवरील धोकादायक व लोंबकळणारा भाग खाली पाडला. तसेच परिसर बॅरिकेड्स लावून बंद करण्यात आला आहे.

या बचाव व सुरक्षा कार्यात महापालिकेचे अग्निशमन दल, पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा आणि संबंधित विभागीय कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान, या दुर्घटनेचा पुढील तपास अग्निशमन दलाचे अधिकारी, स्थानिक पालिकेचे अधिकारी व स्थानिक पोलीस करत आहेत.

Gurugram Hit-and-Run : महिला बाईक रायडरला कारची जोरदार धडक; फरार आरोपी पोलिसांच्या ताब्यात, थरारक घटना कॅमेऱ्यात कैद

Mumbai : मेट्रो ९ टप्पा २ साठी विशेष वाहतूक ब्लॉक; १५ ते २५ सप्टेंबर दरम्यान सकाळी वाहतूक उशीरा सुरू होणार

Jio-Airtel चा Vi ला दणका; मोबाईल नंबर पोर्टेबिलिटीवरून TRAI कडून चौकशी सुरू, नेमकं प्रकरण काय?

Mumbai : दादर पूर्व स्टेशन परिसर होणार कोंडीमुक्त; टॅक्सी, बेस्टसाठी स्वतंत्र मार्गीका, टॅक्सी स्टँड

परिचारिकांना महिन्याला आठ सुट्या द्या; राज्य शासनाच्या धर्तीवर ४० तासांचा आठवडा करा, परिचारिका संघटनेने BMC चे लक्ष वेधले