मुंबई

राणी बागेत पेंग्विनचे धुमधडाक्यात बारसे

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय मुंबई नव्हे तर देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण आहे.

प्रतिनिधी

मुंबई : पर्यटकांचे आकर्षण असलेल्या राणी बागेत तीन पेंग्विन जन्मले असून त्यांचे बारसे शुक्रवारी धुमधडाक्यात साजरे करण्यात आले. सहा वर्षांपूर्वी नव्याने सहा पेंग्विन आणले होते; मात्र आता तीन नवीन पेंग्विन जन्मल्याने पेंग्विनची संख्या १८ वर पोहोचली आहे. मोल्ट आणि फ्लिपरचे बाळ कोको (मादी), पोपॉय व ऑलिव्हचे बाळ स्टेला (मादी) आणि डोनाल्ड आणि डेझीचे बाळ जेरीचे (नर) बारसे करण्यात आल्याची माहिती उद्यान व प्राणी संग्रहालयाचे संचालक डॉ. संजय त्रिपाठी यांनी दिली.

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणीसंग्रहालय मुंबई नव्हे तर देशविदेशातील पर्यटकांचे आकर्षण. त्यात २०१७ मध्ये राणी बागेत नवीन पाहुणे ८ पेंग्विन आले आणि पर्यटकांच्या आकर्षणात भर पडली. पेंग्विन आल्याने पर्यटकांच्या संख्येत वाढ झाली.

दररोज पाच ते सहा हजार पर्यटक भेट देतात. परंतु शनिवार व रविवारी ही संख्या १५ ते १६ हजारांपर्यंत जाते, तर सणासुदीच्या काळात, तर पर्यटकांची संख्या ४० हजारांच्या घरात जाते. यावर्षी दिवाळीच्या सुट्टीत पाच दिवसांत एकूण १ लाख ११ हजार ४६४ पर्यटकांनी भेट दिली असून, ४१ लाख ७४ ९४५ रुपयांचा महसूल जमा झाला आहे.

जेवणाची थाळी महागली...! शाकाहारी थाळी २९ रुपयांनी वाढली; ब्रॉयलर कोंबडी १० टक्क्यांनी महागली, मांसाहारी थाळीही महागच

Thane : कावेसरमध्ये महापालिकेची CBSE शाळा; पूर्व प्राथमिक ते दहावीपर्यंत शिक्षणाची सुविधा

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी राज्यस्तरीय कृती दलाची स्थापना; अध्यक्षपदी डॉ. नीलम गोऱ्हे यांची नियुक्ती

राज्याच्या लॉजिस्टिक्स व सागरी क्षमतेला मोठा बूस्ट; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा विश्वास

पीएम-फिनटेक परिषद : मोदींचे UPI विस्ताराचे आवाहन