Mumbai : पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा; २ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
मुंबई

Mumbai : पेट्रोलपंप चालकांचा ‘यूपीआय बंद’चा इशारा; २ हजारांवरील व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्कातून पेट्रोलपंपांना वगळण्याची मागणी

केंद्र सरकारने २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ‘पर्सन-टू-मर्चंट’ (पी२एम) यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर (एमडीआर) लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पेट्रोलपंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

प्रतिनिधी

अभिषेक पाठक

मुंबई : केंद्र सरकारने २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या ‘पर्सन-टू-मर्चंट’ (पी२एम) यूपीआय व्यवहारांवर सुधारित व्यापारी सवलत दर (एमडीआर) लागू करण्याचा निर्णय घेतल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील पेट्रोलपंप चालकांनी १५ ऑक्टोबरपासून यूपीआय पेमेंट स्वीकारणे बंद करण्याचा इशारा दिला आहे.

सुधारित एमडीआरमधून पेट्रोलपंपांना पूर्णपणे वगळावे, अशी मागणी पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईने रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) आणि केंद्रीय अर्थ मंत्रालयाकडे केली आहे.

अर्थ मंत्रालयाने जाहीर केलेल्या सुधारित एमडीआर व्यवस्थेनुसार, २ हजार रुपयांपेक्षा अधिक रकमेच्या पी२एम यूपीआय व्यवहारांवर ०.४ टक्के शुल्क आकारले जाणार आहे. यात छोटे विक्रेते आणि सूक्ष्म व्यापाऱ्यांना काही अपवाद देण्यात आले आहेत. पेट्रोलपंप चालकांच्या मते, इंधनाच्या किमती नियंत्रित असल्याने आणि व्यवहाराचा अतिरिक्त खर्च थेट ग्राहकांवर टाकता येत नसल्याने या शुल्कामुळे आधीच मर्यादित असलेल्या त्यांच्या नफ्याच्या मार्जिनवर परिणाम होणार आहे.

“आमच्या पेट्रोलपंपांवरील पेट्रोल आणि डिझेल विक्रीच्या एकूण व्यवहारांपैकी ६० टक्क्यांहून अधिक व्यवहारांचे डिजिटलायझेशन झाले आहे. शून्य एमडीआरच्या स्पष्ट आश्वासनावर मोठ्या प्रमाणात पायाभूत सुविधा उभारण्यात आल्या. मात्र, सुधारित व्यवस्थेमुळे अनेक गंभीर अडचणी निर्माण होत असून पेट्रोलपंप चालकांसमोर अस्तित्वाचे संकट निर्माण झाले आहे,” असे पेट्रोल डीलर्स असोसिएशन ऑफ मुंबईचे अध्यक्ष चेतन मोदी यांनी सांगितले.

डिजिटल इंडियाच्या मोहिमेचा भाग म्हणून पेट्रोलपंपांनी डिजिटल पेमेंटची पायाभूत सुविधा उभारण्यासाठी मोठी गुंतवणूक केली असल्याचे असोसिएशनने म्हटले आहे. गेल्या अनेक वर्षांत पेट्रोलपंप चालकांचे कमिशन मार्जिन मोठ्या प्रमाणात बदललेले नाही. त्याचवेळी परिचालन आणि अनुपालनाचा खर्च वाढला आहे, असेही डीलर्सनी निदर्शनास आणून दिले. प्रस्तावित एमडीआरमध्ये काही प्रमाणात सवलत मिळाली नाही तर पेट्रोलपंप चालकांना मोठा आर्थिक भार सहन करावा लागणार आहे.

..तर वाहनचालकांची गैरसोय

पेट्रोलपंपांवरील यूपीआय सुविधा बंद करण्याच्या इशाऱ्यामुळे डिजिटल पेमेंटकडे मोठ्या प्रमाणात वळलेल्या हजारो वाहनचालकांच्या गैरसोयीचा मुद्दाही उपस्थित झाला आहे. पोईसर येथील वाहनमालक बंटी सिंह म्हणाले, “मी अनेकदा पाकीट किंवा पुरेसे सुट्टे पैसे न घेताच घराबाहेर पडतो. पेट्रोलपंपांवरील यूपीआय पेमेंट बंद झाल्यास माझी मोठी गैरसोय होईल.”

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Mira-Bhayandar : मेहतांच्या कंपनीची बांधकाम परवानगी रद्द; अधिकाऱ्यांवर कधी कारवाई होणार याची चर्चा

Mumbai : दहिसरमध्ये बेकायदा दुकाने तोडली; शिव वल्लभ रोडवरील अतिक्रमणांवर कारवाई

डीजीपींच्या आदेशांचे उल्लंघन केल्यास केवळ ‘सौम्य शिक्षा’?; मुंबई उच्च न्यायालयाचा सवाल

उपोषण मागे! सरकारशी चर्चेनंतर मनोज जरांगेंचा निर्णय; दिली तीन महिन्यांची अंतिम मुदत

महिलांची आज जपानशी सलामी! आशिया चषक विजेता भारतीय संघ आता आशियाई स्पर्धेच्या मोहिमेवर