छाया सौ. सलमान अन्सारी
मुंबई

कबुतरखाना बंदी: कबुतरांसाठी मोकळ्या जागेचा शोध घेण्याची सूचना

मुंबईत कबुतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे.

Swapnil S

मुंबई : मुंबईत कबुतरांना आहार देण्यावर निर्बंध लावण्यात आल्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीची दखल घेत राज्याचे कॅबिनेट मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र लिहून पक्षीप्रेमी, साधू-संत व नागरिकांनी व्यक्त केलेल्या भावना लक्षात घेण्याची विनंती केली आहे. न्यायालयाच्या निर्णयाचा मान ठेवत सुवर्णमध्य काढण्याचे आवाहन त्यांनी पत्राद्वारे केले. संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, बीकेसी आदी ठिकाणी सुरक्षित व नियंत्रित आहार क्षेत्र निश्चित करण्यात यावे, अशा सूचना मंत्री लोढा यांनी आयुक्तांना दिलेल्या पत्रातून सूचवल्या आहेत.

आहाराअभावी कबुतरांचा रस्त्यांवर मृत्यू होत असून त्यामुळे नवीन सार्वजनिक आरोग्यविषयक समस्या उद्भवत आहेत. याबाबत महापालिकेने व्यापक आणि संतुलित दृष्टिकोन ठेवावा, अशी अपेक्षा लोढा यांनी व्यक्त केली आहे.

रेशन दुकानदारांसाठी आनंदाची बातमी! मार्जिन रकमेत झाली वाढ; मंत्रिमंडळाचा महत्त्वाचा निर्णय

गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ; पुणे पोलिसांच्या निष्क्रियतेवर HC चा संताप; कडक शब्दांत ताशेरे

प्रवासी घटले, उत्पन्न मात्र ‘बेस्ट’; तिकीट दरवाढीचा परिणाम, दैनंदिन महसूल 'इतक्या' कोटींवर

अमेरिकेच्या भूमीवरून मुनीर यांनी ओकली गरळ; भारताला अणुहल्ल्याची धमकी

ही पाकिस्तानची जुनीच खोड! अणुहल्ल्याच्या धमकीला भारताचे सडेतोड उत्तर