जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटावर प्लास्टिकचा ढिग; २.५ टन कचरा गोळा 
मुंबई

जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटावर प्लास्टिकचा ढिग; २.५ टन कचरा गोळा

जागतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटाला आता समुद्री प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. रविवारी राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.

Swapnil S

उरण : जागतिक वारसा स्थळ असलेल्या एलिफंटा बेटाला आता समुद्री प्रदूषणाचा गंभीर धोका निर्माण झाला आहे. रविवारी राबवण्यात आलेल्या एका विशेष स्वच्छता मोहिमेत ५०० मीटरच्या परिघातून २.५ टन कचरा हटवण्यात आला. या मोहिमेने मुंबई आणि आसपासच्या सागरी प्रदूषणाची भयावह स्थिती पुन्हा एकदा चव्हाट्यावर आणली आहे.

ही मोहीम 'वनशक्ती' या पर्यावरण संस्थेच्या 'सागरशक्ती' (किनारपट्टी विभाग) पुढाकाराने राबवण्यात आली. यामध्ये महाराष्ट्र वन विभागाचा मॅन्ग्रोव्ह कक्ष, न्हावा, गव्हाण, दिवाळे कोळीवाडा आणि परिसरातील पारंपारिक मच्छिमार संघटना, ६० हून अधिक निसर्गप्रेमी आणि अधिकारी यांनी सक्रिय सहभाग नोंदवला. केवळ ५०० मीटर अंतरात सापडलेल्या कचऱ्यामध्ये बाटल्या, पिशव्या आणि वेष्टने, टाकाऊ जाळी आणि इतर जुने साहित्य, चपला, गाद्या आणि इतर टाकाऊ सामान, वैद्यकीय कचरा आदी वस्तूंचा समावेश होता.

या मोहिमेतून समोर आलेले वास्तव पाहता, पर्यावरणाचे रक्षण करण्यासाठी किनारी भागात कचरा टाकणाऱ्यांवर प्रशासकीय वचक निर्माण करणे, स्थानिक समुदाय आणि पर्यटकांमध्ये सागरी परिसंस्थेबद्दल जागरूकता निर्माण करणे, वारसा स्थळांच्या ठिकाणी कचरा व्यवस्थापन यंत्रणा अधिक सक्षम करणे आदी पावले उचलणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी नमूद केले. एलिफंटा बेटासारख्या ऐतिहासिक वारशाचे रक्षण करण्यासाठी आता केवळ सरकारी यंत्रणाच नव्हे, तर नागरिकांनीही जबाबदारीने वागणे काळाची गरज बनले आहे.

मुंबई आपल्या किनाऱ्यांशी किती बेफिकीरपणे वागते, याचे हे पुन्हा एकदा दुर्दैवी उदाहरण आहे. मॅन्ग्रोव्ह स्वच्छता मोहिमांमध्ये टनावारी प्लास्टिकसोबतच गाद्या आणि वैद्यकीय कचरा आढळणे ही चिंतेची बाब आहे.
बी. एन. कुमार, संचालक, नॅटकनेक्ट फाऊंडेशन

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड