ANI
मुंबई

पश्चिम रेल्वेवर प्रवाशांचे हाल सुरुच ;आज २३३ लोकल रद्द, ८३ लोकल प्रवासी सेवेत

प्रवाशांना दिलासा देत गैरसोय टाळण्यासाठी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी रद्द केलेल्या पैकी ६८ लोकल पूर्ववत सुरू करण्यात आल्या.

नवशक्ती Web Desk

मुंबई : खार-गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या लेनचे काम करण्यासाठी पश्चिम रेल्वेने जम्बोब्लॉक घेतला आहे. ७ नोव्हेंबरपर्यंत हे काम सुरू राहणार असून मंगळवारी ३१६ पैकी २३३ लोकल रद्द करण्यात आल्या आहेत व तर प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी मंगळवारी ८३ लोकल प्रवासी सेवेत धावतील, असे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

खार आणि गोरेगाव स्थानकादरम्यान सहाव्या मार्गाचे काम जलदगतीने पूर्ण करण्याचा पश्चिम रेल्वेचा प्रयत्न आहे. प्रवाशांची गैरसोय होऊ नये यासाठी लोकल चालवण्याचा प्रयत्न आहे. यापूर्वी जाहीर केल्यानुसार रद्द करण्यात आलेल्या लोकलपैकी जास्तीत जास्त चालवण्याचा प्रयत्न करणार असल्याचे पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले.

प्रवाशांना दिलासा देत गैरसोय टाळण्यासाठी सोमवार ३० ऑक्टोबर रोजी रद्द केलेल्या पैकी ६८ लोकल पूर्ववत सुरू करण्यात आल्या. याआधी घोषित केल्याप्रमाणे ३१६ पैकी केवळ २४८ लोकल सोमवारी रद्द करण्यात आल्या. तर उद्या मंगळवारी ३१ ऑक्टोबर रोजी ८३ लोकल चालवण्यात येतील. याआधी घोषित केल्यानुसार ३१६ पैकी २३३ लोकल मंगळवारी रद्द केल्या जातील, असे पश्चिम रेल्वेतर्फे सांगण्यात आले.

Mumbai : 'मेलोडी रोड'वर निर्बंध; रहिवाशांच्या तक्रारीनंतर BMCचा निर्णय, आठवड्यातील ३ दिवस 'जय हो' बंद

दोन महिन्यांचीच इंधनशिदोरी! केंद्र सरकारचे अखेर इंधन स्थितीबाबत स्पष्टीकरण

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

पुण्यात रंगणार 'राडा २०२६'; महाराष्ट्राचा पहिला मराठी पॉप कल्चर फेस्टिव्हल, तरुणांसाठी मोठं व्यासपीठ

कर्करोग रुग्णांसाठी अद्ययावत स्वतंत्र इमारत; १२ ऑपरेशन थिएटर, ३ हजारपेक्षा अधिक बेड्स, फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन