मुंबई

धक्कादायक! धारदार मांजाने गळा चिरला गेल्याने पोलीस कॉन्स्टेबलचा मृत्यू; ड्यूटी संपवून घरी जाताना घडली घटना

समीर जाधव असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव असून या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

Swapnil S

मांजा हा धारदार असल्यामुळे अनेक दुर्घटना घडतात. अनेक पशू पक्षांना यामुळे इजा होते. मांजामुळे अनेक दुर्घटना घडल्याचे देखील आपण ऐकले असेल. अशीच एक दुर्घटना मुंबईत घडली आहे. मांजामुळे एका पोलीस कॉन्स्टेबलला आपला जीव गमवावा लागला आहे. रविवारी दुपारी ड्यूटी संपवून आपल्या दुचाकीवरुन घरी जात असताना पंतगांच्या मांजाने गळा चिरला गेल्याने एका पोलीस शिपायाचा मृत्यू झाला आहे. समीर जाधव असे या मृत कॉन्स्टेबलचे नाव असून या प्रकरणी खेरवाडी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, सांताक्रूझ पूर्वेच्या वाकोला पुलावर ही दुर्दैवी घटना घडली. समीर जाधव हे वरळीतील बीडीडी जाळीत वस्ताव्यास होते. ते गोरेगावमधील दिंडोशी पोलीस ठाण्यात ड्यूटी करत होते. जाधव रविवारी दुपारी ड्यूटी संपल्यानंतर दुचाकीवरुन घरी जात असताना वाकोला पुलावर त्यांच्यासमोर अचानक पतंगाचा मांजा आला. या मांजाने समीर यांचा गळा चिरला गेला. ते स्वत:ला सावरण्याचा प्रयत्न करत होते. मात्र, ते बाईकवरुन खाली पडून गंभीर जखमी झाले.

यावेळी आजूबाजूला उपस्थित असलेल्या वाहन चालकांनी गस्तीवर असलेल्या पोलिसांना याबाबत माहिती दिली. यानंतर खेरवाडी पोलिसांचे पथक तातडीने घटनास्थळी पोहचेल आणि त्यांनी समीर यांना तातडीने सायन रुग्णालयात दाखल केले. मात्र, तोपर्यंत उशिर झाल्याने समीर यांचा प्राणज्योत मालावली होती. समीर यांच्या खिशात असलेल्या ओळखपत्रावरुन ते पोलीस दलात कार्यरत असल्याचे पोलिसांना समजले. यानंतर समीर यांच्या कुटुंबीयांना आणि दिंडोशी पोलीस ठाण्याला याबाबतची माहिती देण्यात आली. समीर यांच्या अशा दुर्दैवी आणि अकस्मात मृत्यूमुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन