मुंबई

पोक्सो गुन्ह्यात पोलिसांची बेफिकीरी चालणार नाही -हायकोर्ट

कांदिवली-समतानगर येथील दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे

नवशक्ती Web Desk

मुंबई : पोक्सोच्या गंभीर गुन्ह्याचा तपास करताना, जर पोलीस बेफिकीर वागत असतील, तर ते कदापी खपवून घेतले जाणार नाही, असा सज्जड दमच मुंबई हायकोर्टाने पोलिसांना दिला. न्यायमूर्ती गोविंद सानप यांनी पोक्सो प्रकरणातील आरोपीच्या जामीन अर्जावर सुनावणी करताना गुन्हा नोंदवून दोन वर्षे उलटली तरी तुम्ही न्यायवैद्यक अहवाल कसा काय मिळवला नाही? असा संतप्त सवाल उपस्थित केला. तुमच्या अशा बेफिकिरीमुळे आरोपी वर्षानुवर्षे तुरुंगातच खिचपत पडेल आणि पीडित अल्पवयीन मुलींनाही न्याय मिळणे कठीण होईल, अशी टिप्पणीही न्यायालयाने यावेळी केली.

कांदिवली-समतानगर येथील दोन अल्पवयीन मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी अटकेत असलेल्या आरोपीने मुंबई हायकोर्टात जामिनासाठी अर्ज केला आहे. त्या अर्जावर गुरुवारी न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी वकिलांनी या प्रकरणात पोलिसांनी मोबाईल व दोन लॅपटॉप जप्त केला. मात्र जप्त केलेल्या उपकरणांचा न्यायवैद्यक अहवाल अद्याप मिळवला नसल्याचे न्यायालयात स्पष्ट केले. त्याची गंभीर दखल घेत न्यायालयाने पोलीस व सरकारी पक्षाला चांगलेच धारेवर धरले.

कोर्टाची पोलिसांवर प्रश्नांची सरबत्ती

“गुन्हा नोंदवून दोन वर्षे उलटली तरी तुम्ही अद्याप न्यायवैद्यक अहवाल का मिळवला नाही? पोलिसांनी न्यायवैद्यक प्रयोगशाळेकडे पत्रव्यवहार केला का? केला असेल तर किती वेळा पत्रव्यवहार केला? असे प्रश्‍न उपस्थित करत याचा सविस्तर तपशील न्यायालयापुढे सादर करा, असे निर्देश देत न्यायालयाने सुनावणी ४ नोव्हेंबरपर्यंत तहकूब केली.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री