मुंबई

Supriya Sule : राष्ट्रवादीच्या ३ बड्या नेत्यांचे भावी मुख्यमंत्री म्हणून पोस्टर; सुप्रिया सुळे म्हणाल्या...

प्रतिनिधी

गेल्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षाकडून भावी मुख्यमंत्री म्हणून ३ बड्या नेत्यांचे पोस्टर झळकावण्यात आले. आधी अजित पवार, नंतर जयंत पाटील आणि आता नेत्या सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांचा भावी मुख्यमंत्री म्हणून उल्लेख करणारा एक पोस्टर झळकवण्यात आला. मागील काही दिवसांपासून मुंबईतील राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयासमोर पक्षातील वरिष्ठ नेत्यांचे भावी मुख्यमंत्री असे पोस्टर लावण्यात आल्याचे पाहायला मिळाले. त्यामुळे अनेक चर्चा होऊ लागली आहेत.

राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या वाढदिवसाच्या दिवशी मुंबईतील नेपियन्स रोड परिसरात महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे जयंत पाटील यांचे पोस्टर लावण्यात आले होते. यानंतर अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांचे पोस्टर लावण्यात आले. मात्र, त्या दोघांच्या पोस्टरवर कोणाचेही नाव लिहिले नव्हते. त्यामुळे हे पोस्टर नेमके कोणी लावले? हा एक मोठा प्रश्न आहे. दरम्यान, यावर प्रतिक्रिया देताना सुप्रिया सुळे मात्र चांगल्याच संतापल्या होत्या. त्या म्हणाल्या की, "महिलेचा फोटो कुठेही वापरता येत नाही. फोटो लावण्याचा कोणालाही अधिकार नाही," अशी तंबी त्यांनी दिली.

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या की, "हे पोस्टर कोणी लावले? हा पुरावा असला पाहिजे. कोणीही कोणाचेही पोस्टरवर फोटो लावण्याचा अधिकार कोणालाही नाही. एका महिलेचा फोटो पोस्टरवर लावण्याचाही कोणाला अधिकार नाही. जर कोणी लावला असेल आणि त्याच्यावर कोणाचं नाव नसेल, तर माझी मुंबई पोलिसांना विनंती आहे. माझा फोटो किंवा पोस्टर मला न सांगता कोणी लावला असेल, तर मला मुंबई पोलिसांनी न्याय मिळवून द्यावा" अशी मागणी त्यांनी केली आहे.

अजब पालिकेचा गजब कारभार! CSMT स्थानकाजवळील भुयारी मार्गाची दुरुस्ती; नव्या लाद्या काढून पुन्हा नवीनच लाद्या बसवण्याचे काम

शिवसेना खरी कोणाची यावरील दक्षिण मुंबईचा कौल निर्णायक!

गिलचे अतिकौतुक महागात पडेल; श्रीकांत यांची टीका, ऋतुराजला राखीव खेळाडूंतूनही वगळल्यामुळे नाराजी

डबेवाला कामगार पुतळा हटवण्याच्या हालचाली : १ मे रोजी पुतळा झाकून ठेवल्याने अभिवादन करता आले नाही; डबेवाल्यांनी व्यक्त केली खंत

...अन्यथा चर्चगेट स्थानक जप्त करू; पश्चिम रेल्वे प्रशासनाला हायकोर्टाचा दणका