मुंबई

पवई तलाव ओव्हर फ्लो ! ५४५ कोटी लिटर इतकी जलधारण क्षमता

गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असून पिण्याव्यतिरिक्त पाण्याच्या वापरासाठी पवई तलावातील पाण्याचा वापर होतो.

Swapnil S

मुंबई: पावसाने पाठ फिरवल्याने मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणातील पाणीसाठ्यात घट झाली होती. मात्र गेल्या काही दिवसांपासून पावसाची उघडझाप सुरू असून पिण्याव्यतिरिक्त पाण्याच्या वापरासाठी पवई तलावातील पाण्याचा वापर होतो. सोमवारी सकाळी ४.४५ वाजताच्या सुमारास तलाव ओसंडून वाहू लागला. मुंबईतील पहिला तलाव भरल्याने आता उर्वरित तलावक्षेत्रातही वरुणराजाची अशीच कृपा राहील, अशी अपेक्षा नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

मुंबई महापालिका क्षेत्रातील कृत्रिम तलावांपेकी एक पवई तलाव आहे. हा तलाव १८९० मध्ये १२.५९ लाख रुपये खर्चुन बांधण्यात आला होता. या तलावाचे पाणी

पिण्यायोग्य नसल्याने प्रामुख्याने औद्योगिक, उद्याने आदी कामांसाठी वापरण्यात येते. सोमवारी पवई तलाव पहाटे ४:४५ वाजताच्या सुमारास पूर्ण भरून वाहू लागला आहे. ५४५ कोटी लिटर एवढी जलधारण क्षमता असणाऱ्या या तलावाचे पाणी हे मनुष्यास पिण्यायोग्य नसल्याने औद्योगिक वापरासाठी व आरे दुग्ध वसाहतीतील पिण्याव्यतिरिक्तच्या इतर कारणांसाठी वापरले जाते. गेल्या तीन दिवसात या धरण क्षेत्रात पावसाची स्लो इनिंग सुरू असून हळूवार पाणीसाठ्यात वाढ होत आहे. सोमवारी सकाळी पवई तलाव ओसंडून वाहू लागल्याने पिण्याव्यतिरिक्त कामासाठी उपयोग करण्यात येईल, असे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

असा आहे तलाव

■ पालिका मुख्यालयापासून साधारणपणे २७ किलोमीटर (सुमारे १७ मैल) अंतरावर हा तलाव आहे.

■ या कृत्रिम तलावाचे बांधकाम सन १८९० मध्ये पूर्ण झाले. या तलावाच्या बांधकामासाठी सुमारे १२.५९ लाख रुपये एवढा खर्च तेव्हा आला होता.

■ या तलावाचे पाणलोट क्षेत्र हे सुमारे ६.६१ किलोमीटर असून तलाव पूर्ण भरलेला असल्यास पाण्याचे क्षेत्रफळ हे सुमारे २.२३ चौरस किलोमीटर एवढे असते.

तलाव पूर्ण भरलेला असताना तलावामध्ये ५४५.५ कोटी लिटर पाणी असते. (५४५५ दशलक्ष लिटर) हा तलाव पूर्ण भरून वाहू लागल्यानंतर या तलावाचे पाणी हे मिठी नदीला जाऊन मिळते.

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’

‘निसार’ उपग्रहाचे इस्रोकडून यशस्वी प्रक्षेपण; घनदाट जंगल व अंधारातही छायाचित्र टिपण्याची क्षमता

मालेगाव बॉम्बस्फोटाचा आज निकाल

२०११ पर्यंतच्या झोपडीधारकांना लॉटरी! मिळणार ५०० चौरस फुटांचे घर; शासकीय भूखंडावरील अतिक्रमणधारकांना राज्य सरकारचा दिलासा

IND vs ENG : आजपासून ओव्हलवर निर्णायक द्वंद्व; कसोटी मालिका बरोबरीत सोडवण्यासाठी भारताला पाचव्या सामन्यात विजय अनिवार्य