मोरोक्कोत रंगणार फेस्टिव्हल; प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना विशेष निमंत्रण संग्रहित छायाचित्र
मुंबई

मोरोक्कोत रंगणार फेस्टिव्हल; प्रसिद्ध चित्रकार प्रकाश बाळ जोशी यांना विशेष निमंत्रण

प्रख्यात कलावंत प्रकाश बाळ जोशी यांना मोरोक्कोतील ७व्या आंतरराष्ट्रीय फाइन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये (एफआयएपी २०२५) विशेष आमंत्रित कलावंत म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.

Swapnil S

मुंबई : प्रख्यात कलावंत प्रकाश बाळ जोशी यांना मोरोक्कोतील ७व्या आंतरराष्ट्रीय फाइन आर्ट्स फेस्टिव्हलमध्ये (एफआयएपी २०२५) विशेष आमंत्रित कलावंत म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे. कॅडी एय्याड युनिव्हर्सिटीने सर्व नियोजन केले आहे. “कचऱ्यातून जन्मलेल्या कलाकृतींना नवे कथानक आणि अमर जीवन देणे” या संकल्पनेवर आधारित हा अनोखा महोत्सव ९ ते १२ डिसेंबर २०२५ दरम्यान होणार आहे.

प्रकाश बाळ जोशी यांच्या ॲबस्ट्रक्ट पेंटिगला जगभरात चांगला प्रतिसाद मिळाला आहे . त्यांच्या कलाकृती फक्त सुंदर नाहीत, त्या पर्यावरण जागृतीचे प्रभावी माध्यमही आहेत. त्यांना या प्रतिष्ठित महोत्सवासाठी निमंत्रित करण्यात आल्याने एक प्रकारे भारतीय कलावंताचा सन्मान असून त्या निमित्ताने मराकेशच्या लाल भिंतींमध्ये भारतीय रंग उमलणार आहे. प्रकाश बाळ जोशी यांनी आपल्या प्रतिभेने देशासह देशाबाहेरही नावलौकिक कमावला आहे. जगभर त्यांचा चाहता वर्ग आहे.

कोचिंग क्लासेसना चाप! प्रस्तावित कायद्याचा मसुदा प्रसिद्ध; इंटिग्रेटेड कोचिंगसह १३ वर्षांखालील मुलांच्या प्रवेशास बंदी; साप्ताहिक सुट्टीची सक्ती

Mumbai : मैदाने वाचवण्यासाठी मुंबईकर रस्त्यावर; पालिकेसमोर आंदोलनाचा आदित्य ठाकरेंचा इशारा

नर्सिंगचा पेपरही फुटला; परभणीत परीक्षा पर्यवेक्षिकेचाच कारनामा

डॉग स्क्वॉडमधील सेवेनंतरही कुत्र्यांची जबाबदारी पोलिसांची; निवृत्त श्वानांना मिळणार पोलीस दलातच निवारा

'सीजेपी' कार्यकारिणीची आज बैठक