मुंबई

महापालिकेच्या शिरपेचात ताज शिक्षण विभागातील प्रीती दिघे मिस महाराष्ट्र

घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या प्रती दिघे या शिक्षण विभागात कार्यरत आहेत.

नवशक्ती Web Desk

मुंबई : पुणे येथे नुकत्याच पार पडलेल्या अखिल महाराष्ट्र सौंदर्य स्पर्धेत मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागात कार्यरत प्रीती दिघे यांनी मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र किताब पटकावला. १५० स्पर्धकात त्यांना मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र पुरस्कार मिळाल्याबद्दल शिक्षण विभागासह पालिकेच्या विविध विभागाकडून कौतुक केले.

घाटकोपर भटवाडी येथे राहणाऱ्या प्रती दिघे या शिक्षण विभागात कार्यरत आहेत. शिक्षण विभागात त्या विविध पदावर जबाबदारी पार पाडत आहेत. आपली जबाबदारी पार पाडत त्यांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी विशेष मेहनत घेतली. शिक्षण विभागाकडून वेळोवेळी सहकार्य मिळाले. त्यामुळे हा किताब पटकाणे शक्य झाले. त्यामुळे शिक्षण विभागातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार दिघे यांनी मानले.

गौरा फॅशन क्लब तर्फे आयोजित अखिल महाराष्ट्र स्तरावरील सौंदर्य स्पर्धा मिस, मिसेस व मिस्टर ग्रीन ऑफ महाराष्ट्र पेजेंट २०२३ सीजन ५ मध्ये प्रीती दिघे यांनी मिसेस महाराष्ट्र हा किताब पटकावला. तसेच त्यांनी त्यांच्या बुद्धिमत्तेच्या बळावर सुप्रीमो पुरस्कार व ५१ हजार रुपयांचे पारितोषिक ही मिळवले आहे. सौंदर्य स्पर्धेतील ग्लोविंग स्किन, बेस्ट शेफ ही पारितोषिके जिंकल्याने त्यांचे कौतुक होत आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत