मुंबई

आयपीएलमध्ये खेळत असलेल्या पृथ्वी शॉच्या अडचणीत वाढ; हायकोर्टाने बजावली नोटीस

उच्च न्यायालयाने सेल्फी प्रकरणावरून क्रिकेटपटू पृथ्वी शॉला बजावली नोटीस, सेल्फी प्रकरणावरून अभिनेत्री सपना गिलसोबत झालेल्या वादाचा व्हिडीयो झाला होता व्हायरल

नवशक्ती Web Desk

सध्या आयपीएल २०२३चे सामने सुरु असून दिल्ली कॅपिटल्सचा फलंदाज पृथ्वी शॉ हा आपल्या खराब कामगिरीही झुंज देत आहे. अशामध्ये त्याच्यासाठी आणखी धक्का म्हणजे अभिनेत्री सपना गिलसोबत झालेल्या वादावरून मुंबई उच्च न्यायालयाने त्याला नोटीस बजावली आहे. हे प्रकरण आता चांगलेच चिघळले असून पृथ्वी शॉसमोरील अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

हेही वाचा :

पृथ्वी शॉसोबत सेल्फी घेण्यावरून गोंधळ; घटनेचा व्हिडीओ व्हायरल

काही दिवसांपूर्वी अभिनेत्री आणि सोशल मीडिया स्टार असलेल्या सपना गिल आणि पृथ्वी शॉमध्ये सेल्फी घेण्यावरून चांगलाच वाद झाला होता. यासंदर्भातील व्हिडियो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते. यानंतर शॉने तिच्याविरोधात पोलिसांत तक्रार दाखल केल्यानंतर सपनाला तुरुंगवास भोगावा लागला होता. यानंतर तिने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली. 'माझ्या विरोधातील दाखल केलेला गुन्हा रद्द करावा,' अशी मागणी तिने न्यायालयाकडे केली होती. याप्रकरणी आता क्रिकेटपटू पृथ्वी शॉसह ११ जणांना नोटीस पाठवली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक

घरांच्या किमती वाढल्याची राज्य सरकारची कबुली