ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींनाही किडनॅप करतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा धक्कादायक प्रश्न Photo : IANS
मुंबई

ट्रम्प व्हेनेझुएलाप्रमाणे मोदींनाही किडनॅप करतील का? पृथ्वीराज चव्हाणांचा धक्कादायक प्रश्न

अमेरिकेतील जवानांनी व्हेनेझुएला येथे जाऊन राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. आता असाच प्रकार भारतात घडेल का, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असेच अपहरण केले जाईल का, आता तेवढेच बाकी राहिले आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

Swapnil S

मुंबई : व्हेनेझुएलावर अमेरिकेने जी कारवाई केली ती आपण सगळ्यांनीच पाहिली, अमेरिकेतील जवानांनी व्हेनेझुएला येथे जाऊन राष्ट्रपती निकोलस मादुरो आणि त्यांच्या पत्नीला ताब्यात घेतले. आता असाच प्रकार भारतात घडेल का, पंतप्रधान नरेंद्र मोदींचे असेच अपहरण केले जाईल का, आता तेवढेच बाकी राहिले आहे, असे धक्कादायक वक्तव्य काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले आहे.

व्हेनेझुएलामध्ये जे घडले तसेच भारतातही काही घडेल का, मोदी यांचे अपहरण ट्रम्प करतील का, आता तेवढेच बाकी राहिले आहे असे मला वाटते, असे चव्हाण यांनी म्हटले. भारत अमेरिकेचा दबाव सहन करतो आहे. भारतातून अमेरिकेत निर्यात होणाऱ्या गोष्टी यावर मर्यादा यावी म्हणून टॅरिफ लादले गेले आहे. भारतातून निर्यात रोखणे हाच मुख्य हेतू आहे असे मला वाटते, असेही ते म्हणाले.

राजकीय वातावरण तापले

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, अमेरिकेला निर्यात केल्यानंतर आपल्या देशाला जो नफा मिळत होता तो आता मिळणार नाही. आपल्याला त्यासाठी पर्यायी व्यवस्था बघावी लागेल. या दिशेने देशाचे प्रयत्न पहिल्यापासून सु‌रू आहेत. आता नेमके पुढे काय होणार हे बघावे लागेल. आता डोनाल्ड ट्रम्प हे मोदींचे अपहरण करतील का, हा प्रश्न आहे. कारण आता तेवढेच बाकी राहिले आहे. पृथ्वीराज चव्हाण यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे.

नवी मुंबई पुरस्कारात स्वच्छ, वस्त्यांमध्ये अस्वच्छ! देशपातळीवरील पुरस्कारावर प्रश्नचिन्ह; मुख्य रस्ते चकाचक, अंतर्गत कचऱ्याचे ढीग

राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या मुद्द्यावर सुनेत्रा पवार, पार्थ एकाकी?

रेल्वेची RAC सुविधा रद्द होणार? 'वंदे भारत स्लीपर'मध्ये शेअरिंग बर्थची व्यवस्था नाही

Mumabi : दिवाळीत घर खरेदीचा उत्साह; ११ दिवसांत ३,६८३ मालमत्तांची नोंदणी; उत्पन्नात १३ टक्क्यांची वृद्धी

मदर डेअरी, अमूलपाठोपाठ आता गोकुळचे दूधही महागणार? दरवाढीच्या हालचाली सुरू