मुंबई

मालमत्ता कराची थकबाकी २२,५६५.३८ कोटी रुपयांवर; कर वसुलीचे आव्हान

मालमत्ता कराची थकबाकी २२,५६५.३८ कोटी रुपयांवर पोहोचली असून थकबाकी वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

Swapnil S

मुंबई : मालमत्ता कराची थकबाकी २२,५६५.३८ कोटी रुपयांवर पोहोचली असून थकबाकी वसुलीचा प्रश्न गंभीर बनला आहे.

मुंबई पालिकेचा उत्पन्नाचा मुख्य स्रोत असलेला जकात कर बंद करण्यात आल्यामुळे मालमत्ता कर उत्पन्नाचा मुख्य स्रोत बनला आहे. नवीन करप्रणालीमुळे निर्माण झालेला संभ्रम, कराची थकबाकी, न्यायप्रवीष्ट प्रकरणे, कर देयके देण्यास झालेला विलंब अशा कारणांमुळे मालमत्ता कर वसुलीचे आव्हान पालिकेसमोर आहे.

मालमत्ता कराबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या अंतिम निर्णयाची अंमलबजावणी सुरू आहे. त्यामुळे करदात्यांना २०२३-२४ या आर्थिक वषासाठी संरक्षणात्मक आधारावर २६ फेब्रुवारी २०२४ रोजी मालमत्ता कर देयके देण्यात आली. या देयकांची देय कालावधी २५ मे २०२५ होता. परिणामी २०२३-२४ या वर्षात एकूण मागणीपैकी प्रत्यक्षात २,८६०.६० कोटी रुपये मालमत्ता कर पालिकेच्या तिजोरीत जमा झाला. मालमत्ताधारकांना २०२४-२५ या वर्षाची ६,७४२.७४ कोटी रुपयांचे देयके १३ सप्टेंबर २०२४ रोजी देण्यात आली. त्यामुळे ३१ डिसेंबर २०२४ पर्यंत मालमत्ता करापोटी ५,२२९.२० कोटी रुपये पालिकेच्या तिजोरीत जमा झाले. त्यामुळे २०२३-२४ या वर्षातील १,४९१.३६ कोटी रुपयांचा समावेश आहे. म्हणजेच २०२४-२५ च्या अर्थसंकल्पात मालमत्ता करापोटी ४,९५० कोटी रुपये उत्पन्न प्रस्तावित करण्यात आले होते. त्यापैकी ३७,३७.८४ कोटी रुपये वसूल करण्यात यश आले.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत