Mumbai : दादरमध्ये चेंबरची संरक्षक ग्रील लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल संग्रहित छायाचित्र
मुंबई

Mumbai : दादरमध्ये चेंबरची संरक्षक ग्रील लंपास; अज्ञात व्यक्तीविरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

दादर पूर्व टीटी येथे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अखत्यारितील चेंबरची संरक्षक ग्रील चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

Swapnil S

मुंबई : दादर पूर्व टीटी येथे पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अखत्यारितील चेंबरची संरक्षक ग्रील चोरीला गेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.

चेंबरची संरक्षक ग्रील चोरीला गेल्याने नागरिक व वाहन चालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला. मात्र याची माहिती मिळताच, पालिकेच्या संबंधित विभागाच्या निदर्शनास ही बाब आणून दिल्यावर लगेचच संरक्षक ग्रील बसवण्यात आली असून अज्ञात व्यक्तीविरोधात स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याचे मुंबई महापालिकेतील एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे गटनेते अमेय घोले यांनी म्हटले आहे.

दादर पूर्व टीटी खोदादाद सर्कल येथे रविवारी सकाळी ९.२४ वाजण्याच्या सुमारास पर्जन्य जलवाहिनी विभागाच्या अखत्यारीतील चेंबरची संरक्षक जाळी चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. मात्र संरक्षक ग्रील चेंबरमध्ये पडल्यामुळे संबंधित व्यक्तीस ती जाळी चोरी करता आली नाही. अखेर अज्ञात व्यक्ती चेंबरचे झाकण व्यवस्थित न लावता आल्याने घटनास्थळावरून पळून गेली. त्यामुळे नागरिकांच्या तसेच वाहनांच्या सुरक्षिततेस धोका निर्माण झाला होता. ही घटना तत्काळ पालिकेच्या देखभाल कर्मचाऱ्यांच्या निदर्शनास आणून देण्यात आली. कर्मचाऱ्यांनी चेंबरमधून संरक्षक ग्रील बाहेर काढून ती पूर्ववत बसवली तसेच चेंबर सुरक्षित स्थितीत करण्यात आल्याचे अमय घोले यांनी 'एक्स'वर पोस्ट केले आहे.

दरम्यान, या घटनेबाबत स्थानिक पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरुद्ध एफआयआर दाखल करण्याची विनंती करण्यात आली. परंतु स्थानिक पोलिसांनी एफआयआर नोंदविण्यास नकार देऊन केवळ एनसी नोंदविण्यास तयारी दर्शविल्याचे सांगण्यात आले.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Nana Patekar Passes Away: 'नटसम्राट' नाना पाटेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन, गोव्यात घेतला अखेरचा श्वास

Mumbai : मुलुंडमध्ये बांधकामाधीन इमारतीच्या आवारात भीषण आग; ७ गॅस सिलिंडरचे स्फोट, परिसरात धुराचे लोट, Video व्हायरल

Nana Patekar : 'मी आज आहे, उद्या नसेन'; नाना पाटेकरांचा अखेरच्या भाषणाचा VIDEO व्हायरल

SIR Protest : ध्रुव राठी CJP च्या आंदोलनासाठी भारतात; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी, 'लढा सुरूच राहणार', दिपकेंचा निर्धार

मध्यरात्री मित्राला मेसेज, श्वास घेण्यास त्रास अन्...; नाना पाटेकरांच्या शेवटच्या तासांत नेमकं काय घडलं? डॉक्टरांनी सांगितला घटनाक्रम