मुंबई

धोका पावसाळी आजारांचा; पालिकेचे कीटकनाशक विभाग अॅक्शन मोडमध्ये

यंदाच्या पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली

प्रतिनिधी

यंदाच्या पावसाळ्यात साथीच्या आजारांचा फैलाव होऊ नये, यासाठी पालिकेच्या कीटकनाशक विभागाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमेत डासांची उत्पत्ती स्थाने नष्ट करण्यासाठी सोसायटी, इमारत परिसराची झाडाझडती घेण्यात येणार आहे. तसेच डेंग्यू, चिकुनगुनिया प्रसारक (एडिस) डासांचा शोध घेण्यासाठी झोपडपट्टीत सर्वेक्षण करण्यात येणार आहे. एकूण यंदाच्या पावसाळ्यात साथीच्या आजारांना वेळीच रोखण्यासाठी मुंबई महापालिकेचा कीटक नाशक विभाग अॅक्शन मोडमध्ये आला आहे.

मलेरिया, डेंग्यू, स्वाईन फ्लू, कावीळ, गॅस्ट्रो, चिकनगुनीया, लेप्टो या पावसाळी आजारांचा धोका टाळण्यासाठी कीटक नाशक विभागाने सज्ज झाला आहे. महानगरपालिकेच्या सर्व विभागीय कार्यालयांच्या ठिकाणी डास प्रतिबंधाच्या अनुषंगाने पावसाळापूर्व कार्यवाही करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. पाण्याच्या टाक्या डास प्रतिबंधक स्थितीत करणे, अडगळीतील वस्तू निष्कासित करणे यात अपेक्षित आहे. तसेच डासांच्या उत्पत्ती स्थानांमध्ये पाण्याच्या टाक्या, टायर, इतर वस्तू, पेट्री प्लेट्स, फेंगशुई झाडे, मनी प्लांट इत्यादी ठिकाणीही कार्यवाही करण्याचे आदेश विभाग पातळीवर देण्यात आले आहेत.

पालिका आयुक्त तथा प्रशासक डॉ. इक्बालसिंह चहल यांच्या अध्यक्षतेखाली आणि अतिरिक्त आयुक्त डॉ. संजीव कुमार यांच्या मार्गदर्शनाखाली विविध शासकीय, निमशासकीय, यंत्रणांचा समावेश असणारी डास निर्मूलन समिती ची बैठक लवकरच आयोजित करण्यात येणार आहे.

बांधकाम ठिकाणी लक्ष

बांधकाम सुरू असणाऱ्या ठिकाणी स्वयंसेवी संस्थांच्या स्वयंसेवकांकडून अळीनाशकांची फवारणी केली जात आहे. तसेच बांधकाम कामगारांच्या राहत्या जागेतही भिंतींवर इन्डोअर रेसिड्यूल स्प्रेइंग (आयआरएस) कीटकनाशकांची फवारणी करण्याचे निर्देश दिले आहेत.

कीटकनाशक विभाग सज्ज

* संपूर्ण २२७ प्रभागांमध्ये २२७ धूम्रफवारणी यंत्रे कार्यरत.

* फवारणीसाठी कीटकनाशकांचा पुरेसा साठा उपलब्ध.

* मनुष्यबळ, सामुग्रीची ने-आण करण्याकरिता एकूण १०७ वाहने उपलब्ध.

* कीटकनाशक फवारणीसाठी १ हजार २४५ स्टीरप पंप उपलब्ध.

* एकूण ६६ हजार ९५९ ठिकाणी गप्पी मासे सोडून जीवशास्त्र पद्धतीने डासांच्या अळ्यांवर नियंत्रण.

या गोष्टींचे पालन करा

* घरातील तसेच सभोवतालच्या परिसरातील अडगळीतील साहित्य काढून टाकावे.

* पाण्याच्या टाक्या झाकून ठेवाव्यात.

* टायर्स, भंगार साहित्य, डबे इत्यादी निष्कासित करावेत.

* घरातील शोभिवंत फुलदाण्या, त्याखालील बशा, शोभिवंत कृत्रिम कारंजी, फेंगशुईची झाडे यामधील पाणी आठवड्यातून कमीत-कमी दोन वेळा बदलावे.

Mumbai Rain Update : मुंबईत मुसळधार पाऊस; पुढील तीन तास महत्त्वाचे, हवामान खात्याचा रेड अलर्ट

मराठवाड्यात पावसाचा हाहाकार; बीड, सिल्लोडमध्ये नागरिक अडकले, हेलिकॉप्टरच्या सहाय्याने बचावकार्य सुरू | Video

Mumbai : भरपावसात मोनोरेल पुन्हा बंद; प्रवाशांची सुखरूप सुटका, महिन्याभरातील दुसरी घटना

Waqf Board Amendment Act 2025 : वक्फ बोर्डातील दोन तरतुदींवर स्थगिती, पण संपूर्ण कायदा रद्द करण्यास सुप्रीम कोर्टाचा नकार

डाॅक्टरांचा गुरुवारी संप; सरकारच्या नवीन अधिसूचनेविरुद्ध IMAचा इशारा