शिरीष पवार/मुंबई
मुंबादेवीचा राजा हा किताब दिमाखाने मिरवणारा काशिनाथ उत्कर्ष मंडळाचा सार्वजनिक गणपती हा क्रॉफर्ड मार्केट परिसरातील हिंदू-मुस्लीम बांधवांच्या एकतेचे प्रतीक बनला आहे. पोलीस आयुक्तालय संकुलाकडून जेथे शेख मेमन रस्त्याला सुरुवात होते तेथे जुम्मा मशिदीच्या आधी हाकेच्या अंतरावर मुंबादेवीचा राजा विराजमान होतो.
मुंबादेवीच्या राजाचे रूप अत्यंत आकर्षक आहे. मंडळाचे अध्यक्ष जयसिंग चंदू सावंत आणि सचिव बाबाजी चौगुले यांची भेट घेतली असता ते म्हणाले की, 'या ठिकाणी काशिनाथ बिल्डिंग ही एकच रहिवासी इमारत होती. पाच मजल्यांच्या या इमारतीत १२० कुटुंबे राहत होती. इमारत पाडण्यात आली. काळाच्या ओघात झालेल्या स्थित्यंतरांमुळे गणपती बसविण्यासाठी आवारात जागा अपुरी पडू लागली. मग परिसरातले हिंदू आणि मुस्लीम बांधव एकत्र आले आणि गणपतीसाठी बाहेरील रस्त्यावर जागा तयार केली. आताही पदपथासह अवघ्या दहा ते बारा फूट रुंदीच्या जागेत मंडप उभारला जातो. या ठिकाणचे व्यापारी फेरीवाले आम्हाला चांगले सहकार्य करतात. आता जुन्या इमारतीच्या ठिकाणी गणपती मंडळाचे कार्यालयही सुरू केले आहे. एकेकाळी काशिनाथ बिल्डिंगमध्ये राहणारे, पण आता तेथून विस्थापित झालेले अनेक जण गणरायाच्या सेवेसाठी दूरदूरहून येथे येतात. यात लालबाग, डिलाईल रोड परिसरातून येणारे अनेक जण आहेत. अनंत केवरे हे तर कराडहून खास गणपतीसाठी येतात . गिरगाव ठाकूरद्वारमधून आलेले अभिषेक गुप्ता, मानखुर्दवरून आलेले भारत मिश्रा, भांडुपवरून आलेले सुरेश केशव यांच्याबरोबरच पनवेल, कोपरखैरणे, वाशी येथून पूर्वाश्रमीचे काशिनाथ बिल्डिंगचे रहिवासी गणपतीच्या उत्सवासाठी आवर्जून येतात.
सांस्कृतिक परंपरेचे जतन
दहा वर्षांपूर्वी मंडळाला संपूर्ण दक्षिण मुंबईतून मुंबादेवीचा राजा हा किताब बहाल करण्यात आला. तेव्हापासून मंडळाचा गणपती मुंबादेवीचा राजा म्हणूनच ओळखला जातो. मंडळातर्फे शिवजयंती मोठ्या जोशात साजरी केली