मुंबई

राजस्थानचा प्रमुख फलंदाज जोस बटलरची बॅट तळपणार?

वृत्तसंस्था

इंडियन प्रीमियर लीगमध्ये (आयपीएल) मुंबईतील ब्रेबॉर्न स्टेडियमवर शुक्रवारी राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज हे दोन संघ आमनेसामने येतील. या लढतीत राजस्थानने विजय मिळवल्यास ते दुसऱ्या स्थानासह प्ले-ऑफमध्ये प्रवेश करतील. त्यामुळे राजस्थानचा प्रमुख फलंदाज जोस बटलरची बॅट या सामन्यात तळपणार का, याकडे अवघ्या क्रीडाविश्वाचे लक्ष लागले आहे.

यंदाच्या हंगामात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत बटलर (१३ सामन्यांत ६२७ धावा) अग्रस्थानी आहे. परंतु इंग्लंडच्या या ३१ वर्षीय फलंदाजाला गेल्या चार सामन्यांत (२२, ३०, ७, २) लौकिकाला साजेशी कामगिरी करणे जमलेले नाही. त्यामुळे सध्या गुणतालिकेत १६ गुणांसह तिसऱ्या स्थानी असलेल्या राजस्थानला दिमाखात प्ले-ऑफमध्ये धडक मारायची असल्यास बटलरने धूमधडाका करणे गरजेचे आहे. बटलरने या हंगामात आतापर्यंत तीन शतके झळकावली आहेत.

शेवट गोड करण्यासाठी चेन्नई उत्सुक

महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखालील चेन्नई संघाचे आव्हान आधीच संपुष्टात आले असून शुक्रवारी ते हंगामाचा शेवट गोड करण्याच्या निर्धाराने मैदानात उतरतील. मुकेश चौधरी आणि सिमरजीत सिंग या वेगवान जोडीने चेन्नईसाठी अप्रतिम योगदान दिले असून शिवम दुबे, अंबाती रायुडू आणि स्वत: धोनीनेही सातत्याने छाप पाडली आहे.

चहल, सॅमसनकडून अपेक्षा

बटलरप्रमाणेच राजस्थानला कर्णधार संजू सॅमसन आणि लेगस्पिनर यजुर्वेंद्र चहलकडून फार अपेक्षा आहेत. पर्पल कॅपच्या शर्यतीत चहल २४ बळींसह पहिल्या क्रमांकावर आहे. शिम्रान हेटमायर संघात परतल्यामुळे राजस्थानची चिंता कमी झाली आहे. त्याशिवाय ट्रेंट बोल्ट उत्तम लयीत असल्यामुळे एकूणच राजस्थानचे पारडे जड वाटत आहे.

शिवसेना नाव, धनुष्यबाण चिन्ह कोणाचे ? १४ जुलैला सुनावणी

माऊलींच्या पालखीत 'माऊली'चा अपमान; चोपदाराने वारकरी महिलेला दिलं ढकलून| Video

बाजीराव पेशव्यांच्या पुतळ्याच्या अनावरण कार्यक्रमावर मस्तानी यांच्या वंशजाचा बहिष्कार

कोकणातील कातळशिल्पांचे जतन करा; मुंबई उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला आदेश

दीपिका पदुकोण 'हॉलिवूड वॉक ऑफ फेम'वर झळकणार; इतिहास रचणारी ठरली पहिली भारतीय अभिनेत्री