राणी बागेत अत्याधुनिक मत्स्यालय उभारणीला सुरुवात; पेंग्विनसोबतच समुद्री मासेही मुंबईकरांच्या भेटीला येणार संग्रहित छायाचित्र
मुंबई

राणी बागेत अत्याधुनिक मत्स्यालय उभारणीला सुरुवात; पेंग्विनसोबतच समुद्री मासेही मुंबईकरांच्या भेटीला येणार

भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणीची बाग गेली अनेक वर्षे पर्यटकांना मत्स्यालयाचा अनुभव घेण्याची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. पर्यटकांना पेंग्विनसह समुद्री जैवविविधतेचे दर्शन देणार मत्स्यालय उभारण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे.

Swapnil S

मुंबई : भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान आणि प्राणिसंग्रहालयात म्हणजेच राणीची बाग गेली अनेक वर्षे पर्यटकांना मत्स्यालयाचा अनुभव घेण्याची प्रतीक्षा होती. मात्र ही प्रतीक्षा आता संपली आहे. पर्यटकांना पेंग्विनसह समुद्री जैवविविधतेचे दर्शन देणार मत्स्यालय उभारण्याचे काम प्रत्यक्षात सुरू झाले आहे. मुंबई महापालिकेच्या प्रकल्पामुळे २०२७पर्यंत मुंबईकरांना आधुनिक तंत्रज्ञानयुक्त मत्स्यालय पाहायला मिळणार आहे.

राणी बागेतील पेंग्विन प्रदर्शन केंद्राच्या समोरच्या २५ मीटर x २५ मीटर इतक्या जागेवर हे मत्स्यालय उभारले जात आहे. या मत्स्यालयासाठी ५५ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून सदर काम मेसर्स एस. के. एस. कारकाला कंपनीकडे सोपवण्यात आले आहे. जलचरांसाठी पाण्याची गुणवत्ता आणि संतुलन राखण्यासाठी १०

हजार लिटर क्षमतेची मत्स्यालय जीवनप्रणाली बसवली जाणार आहे. तसेच जलचरांसाठी नैसर्गिक वातावरण निर्माण करण्यासाठी कृत्रिम रॉक वर्क तयार केले जात आहे. या मत्स्यालयात एकावेळी सुमारे १०० पर्यटक सहभागी होऊ शकतात. प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार मत्स्यालय डोम (घुमट) प्राणिसंग्रहालय आकाराच्या संरचनेत उभारले जाणार असून त्यात दोन पारदर्शक टनेल असतीलएलएल. हे टनेल अॅक्रेलिक ग्लासचे असून पर्यटकांना १८० अंशातून अखंडित समुद्री दृश्य पाहायला मिळेल. या टनेलमध्ये प्रवाळ प्रदेश (कोरल रीफ), विविध समुद्री प्रजाती, खोल समुद्रातील मासे यांचे जिवंत प्रतिकृतीभास दृश्य अनुभवता येईल. सिंगापूर आणि दुबईतील प्रसिद्ध टनेल अॅक्वेरियमच्या धर्तीवर ही रचना असली, तरी येथे मुख्य भर भारतीय जलसंपदेतील प्रजातींवर असेल.

... असे असेल मत्स्यालय

मत्स्यालयाच्या प्रवेशद्वारातच छतामधील घुमटाकार मत्स्यालय अभ्यागतांचे स्वागत करील. त्यानंतर दोन थीमवर आधारित पादभ्रमण बोगदे असतील १४ मीटर लांबीचा कोरल फिश बोगदा आणि ३६ मीटर लांबीचा खोल महासागर बोगदा. या बोगद्यातून चालताना पर्यटकांना स्वतः समुद्राच्या तळाशी असल्याचा थरारक अनुभव घेता येणार आहे. तर मत्स्यालयाबाहेर पडताना पर्यटकांसाठी स्मरणिका दुकानही ठेवण्यात येणार असून वन्यजीव, वनस्पतीशास्त्र, पर्यावरण, जलचर इत्यादी विषयांवरील पुस्तके, कलाकृती, खेळणी, वस्तू उपलब्ध असणार आहेत.

मत्स्यालयात विविध प्रकारच्या माशांचा

या मत्स्यालयात ६० ते ६५ विविध प्रकारचे मासे पाहता येणार आहेत. त्यात चेटोडॉन, कॉलर, ओटिगा, व्हॅगाबंडस, मुल्लिडे, डॅसिलस इत्यादी प्रजातींचा समावेश होणार आहे. देश-विदेशातील खोल समुद्रातील अनेक दुर्मिळ प्रजातींचा मुक्त संचार येथे पाहता येणार आहे.

२०२७ मध्ये पूर्ण होणार मत्स्यालय

पेंग्विन प्रदर्शन केंद्रानंतर आता मत्स्यालय उभारले जात असल्याने या प्राणिसंग्रहालयाची पर्यटनदृष्टीने आणखी भर पडणार आहे. २०२७ मध्ये पूर्ण होणाऱ्या या आधुनिक मत्स्यालयामुळे मुंबईकरांना समुद्रातील विविधता, रंगीबेरंगी जीवसृष्टी आणि भारतीय सागरी परिसंस्था एकाच ठिकाणी अनुभवण्याची संधी मिळणार आहे.

Mumbai : चेंबूर बस दुर्घटनेत ११ वर्षीय विद्यार्थ्याचा उपचारादरम्यान मृत्यू; अन्य चार विद्यार्थ्यांची प्रकृती स्थिर

Mumbai : चेंबूरमध्ये शाळेच्या बसवर झाड कोसळले; काही विद्यार्थी जखमी, बचावकार्य सुरू, Video

आता मोबाईल नंबरशिवाय करता येणार चॅट; WhatsApp चं नवं Username फीचर, जाणून घ्या डिटेल्स

सचिन अहिर यांनी पक्ष सोडताच संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले - "जे कधीच नव्हते आमचे...

उद्धव ठाकरेंना आणखी एक धक्का! सचिन अहिर यांचा शिंदे गटात प्रवेश, उपसभापतीपदासाठी अर्ज दाखल