मुंबई

पेंग्विनची नावे कार्टुनच्या पात्रांवरूनच! राणी बाग प्रशासनाचे स्पष्टीकरण

पेंग्विनची नावे कार्टुनच्या पात्रांवरून ठेवण्यात आल्याचा खुलासा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वांना आपलीशी वाटणारी राणीची बाग म्हणजेच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरून नवा वाद निर्माण झाला आहे.

Swapnil S

मुंबई : पेंग्विनची नावे कार्टुनच्या पात्रांवरून ठेवण्यात आल्याचा खुलासा पालिका प्रशासनाच्या वतीने करण्यात आला आहे. सर्वांना आपलीशी वाटणारी राणीची बाग म्हणजेच भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणिसंग्रहालयातील पेंग्विनच्या इंग्रजी नावांवरून नवा वाद निर्माण झाला आहे. दोन दिवसांपूर्वीच भाजपच्या कार्यकर्त्यांनी राणीच्या बागेत मोर्चा काढून पेंग्विनच्या पिल्लांना इंग्रजी नावे का दिली यावरून प्रशासनाला जाब विचारला होता. पेंग्विनना कोणत्याही भाषिक किंवा सांस्कृतिक हेतून नावे ठेवलेली नाहीत. ही नावे केवळ कार्टूनमधील पात्रांवरून ठेवलेली असून, लहान मुलांमध्ये लोकप्रिय असलेल्या कार्टून विश्वातील नावे वापरल्यामुळे मुलांना पेंग्विन अधिक आवडतील आणि त्यांच्याशी जोडले जातील, हा उद्देश होता, असे मत राणी बागेतील अधिकाऱ्यानी व्यक्त केले.

डोनॉल्ड, जेरी, कोको, स्टेला…

राणी बागेतील पेंग्विनसाठी मोल्ड, डोनॉल्ड, डेसी, पोपॉय, ऑलिव्ह, बबल, ओरिओ, बिंगो, निमो, जेरी, फ्लिपर, अॅलेक्सा, सिरी, डोरा, कोको आणि स्टेला अशी नावे देण्यात आली आहेत. यातील अनेक नावे प्रसिद्ध कार्टून पात्रांशी सामर्थ्य साधणारी आहेत.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

Mumbai Metro: सर्व मेट्रो तिकिटासाठी आता एकच ॲप; एकाच वेळी वेगवेगळ्या मार्गांसाठी तिकिटे खरेदी करता येणार

रेल्वे ऑनलाइन तिकीट आरक्षणासाठी आधार अधिप्रमाणीकरण अनिवार्य; १ ऑक्टोबरपासून नियम लागू होणार

नवी मुंबई विमानतळ, मेट्रो अ‍ॅक्वा लाईन ३चे उद्घाटन लांबणीवर