मुंबई

Mumbai : राणीची बाग गणेश चतुर्थीला जनतेकरिता खुली राहणार

साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असणारी राणीची बाग बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘श्री गणेश चतुर्थी’ला जनतेकरिता खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.

Swapnil S

मुंबई : साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असणारी राणीची बाग बुधवारी, २७ ऑगस्ट रोजी ‘श्री गणेश चतुर्थी’ला जनतेकरिता खुली राहणार आहे, तर दुसऱ्या दिवशी गुरुवार, २८ ऑगस्ट रोजी बंद राहणार आहे, अशी माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली. ‘श्री गणेश चतुर्थी’ निमित्ताने सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.

भायखळा (पूर्व) परिसरातील वीरमाता जिजाबाई भोसले वनस्पती उद्यान व प्राणिसंग्रहालय साप्ताहिक सुट्टीनिमित्त दर बुधवारी बंद असते. मात्र, बृहन्मुंबई महानगरपालिकेने यापूर्वी मंजूर केलेल्या एका ठरावानुसार बुधवारी सार्वजनिक सुट्टी आल्यास त्यादिवशी उद्यान व प्राणिसंग्रहालय जनतेसाठी खुले राहते, तर त्याच्या दुसऱ्या दिवशी बंद ठेवण्यात येते.

राज्यभर पुन्हा मुसळधार पाऊस; गणेशोत्सवावर पावसाचे सावट

आझाद मैदानात उपोषण करण्यास HC ची मनाई; पण जरांगे-पाटील मुंबईत येण्यावर ठाम; म्हणाले - "कोर्ट आम्हाला १०० टक्के...

मराठा आरक्षण : मनोज जरांगे-पाटलांना हायकोर्टाचा धक्का; परवानगीशिवाय आझाद मैदानात उपोषणास मनाई

'या रीलमध्ये चुकीचं काय?' रोहित पवारांकडून अथर्व सुदामेची पाठराखण; 'तो' व्हिडिओही पुन्हा केला शेअर

विवाहित लेकीला प्रियकरासह नको त्या अवस्थेत पकडले; बापाने दोघांनाही विहिरीत ढकलून संपवले, धक्कादायक घटनेने नांदेड हादरले