मुंबई

बलात्कार प्रकरणात न्यायालयाचा दणका; आरोपीचा अंतरिम जामीन अर्ज फेटाळला

गतिमंद मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आलेल्या ७३ वर्षीय आरोपीला उच्च न्यायालयाने झटका दिला.

Swapnil S

मुंबई : गतिमंद मोलकरणीवर बलात्कार केल्याच्या गुन्ह्यात दोषी ठरविण्यात आलेल्या ७३ वर्षीय आरोपीला उच्च न्यायालयाने झटका दिला. पीडित मुलीचा बुद्ध्यांक (आयक्यू) केवळ ४२ टक्के होता. त्यामुळे मुलीने शरीरसंबंधाला दिलेली संमती विचारात घेता येणार नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांनी आरोपीला अंतरीम जामीन देण्यास नकार दिला.

२३ वर्षीय तरुणीवर बलात्कार केल्याच्या आरोपाखाली २० वर्षांची शिक्षा भोगत असलेल्या ७३ वर्षीय भालचंद्र म्हात्रे याने या निर्णयाविरोधात केलेले अपील उच्च न्यायालयाने सुनावणीसाठी दाखल करून घेतले. आरोपीने वैद्यकिय कारणास्तव अंतरिम जामिनासाठी उच्च न्यायालयात अर्ज केला होता. या अर्जावर न्यायमूर्ती मिलिंद साठ्ये यांच्या समोर सुनावणी झाली.

पीडित मुलीचा बुद्ध्यांक केवळ ४२ टक्के

पीडित तरुणीची मानसिक स्थिती तसेच आरोपीने पीडित मुलीची गर्भावस्था लपवण्यासाठी केलेल्या प्रयत्नांचे पुरावे विचारात घेत न्या. साठ्ये यांनी वृद्धाचा अंतरिम जामिनाचा अर्ज फेटाळून लावला. बलात्काराची घटना घडली, त्यावेळी पीडित मुलीचा बुद्ध्यांक केवळ ४२ टक्के होता. मानसोपचार तज्ज्ञांच्या अहवालात तसा निष्कर्ष नोंदवलेला आहे. त्यामुळे पीडित मुलीने शरीरसंबंधासाठी दिलेली संमती विचारात घेता येणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने वृद्ध दोषीला दिलासा देण्यास स्पष्ट नकार दिला.

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती

आंदोलनामुळे हॉटेल, दुकाने बंद; आंदोलकांची झाली गैरसोय, सोबत १५ दिवसांची शिदोरी...

CSMT टाळण्याचे प्रवाशांना रेल्वेचे आवाहन; मराठा आरक्षण आंदोलनामुळे दक्षिण मुंबई ठप्प