मंगलप्रभात लोढा  संग्रहित फोटो
मुंबई

रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची पनवेलमध्ये लवकरच भव्य वास्तू; मंत्री मंगलप्रभात लोढा यांची माहिती

युवकांमध्ये रोजगारांसाठीची कौशल्ये विकसित करणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची भव्य इमारत लवकरच पनवेल येथे उभी राहणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली.

Swapnil S

मुंबई : युवकांमध्ये रोजगारांसाठीची कौशल्ये विकसित करणाऱ्या रतन टाटा कौशल्य विद्यापीठाची भव्य इमारत लवकरच पनवेल येथे उभी राहणार आहे, अशी माहिती कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत शुक्रवारी दिली. या विद्यापीठाची जुलै २०२२ मध्ये स्थापना झाली. स्टार्टअप्स, इन्क्युबेशन, रोजगारक्षमता, प्रशिक्षण, समुपदेशन या विशेष बाबींवर विद्यापीठाने लक्ष केंद्रित केले आहे. नवी मुंबई, ठाणे, पुणे आणि नागपूर येथे औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या आवारात आणि खासगी आस्थापनेत केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत, असे ते म्हणाले.

या विद्यापीठाचा दीक्षांत सोहळा शनिवार, २१ मार्च २०२६ रोजी दुपारी २ वाजता लोकभवन येथील दरबार हॉलमध्ये होणार आहे, असेही त्यांनी सांगितले. या कार्यक्रमाला उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. कौशल्याधारित शिक्षणाला चालना देणाऱ्या या विद्यापीठाचा हा पहिलाच दीक्षांत समारंभ अनेक मान्यवर उपस्थित राहणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.

कौशल्याधारित प्रदर्शन

दीक्षांत सोहळ्यानिमित्ताने राज्यभरात आयटीआयसाठी सहकार्य करणाऱ्या संस्थांच्या उपक्रमाचे प्रदर्शन या ठिकाणी होणार आहे. उद्योगक्षेत्रात आघाडीच्या कंपन्यांचे मिळून एकूण बारा स्टॉल्स या ठिकाणी लागणार आहेत. टोयोटा किर्लोस्कर, अॅटलास, हिंदुस्थान एरोनॉटिक्स, दासयू एव्हिएशन तसेच प्रसिद्ध फिल्म निर्माते रॉनी स्क्रूवाला यांचे स्वदेश फाऊंडेशन, अध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांच्या रूरल डेव्हलपमेंट ट्रस्टचाही यात समावेश आहे.

आजचे राशिभविष्य, ४ ऑगस्ट २०२६ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

ऑगस्ट महिना कसा जाईल? बघा तूळ आणि वृश्चिक राशीचे भविष्य

राष्ट्रभक्तीचा जागर देशभर व्हायला हवा

रोज सकाळी भिजवून खा 'हे' ड्रायफ्रूट्स; आरोग्य राहील उत्तम

पायांची सूज, थकवा आणि ताण कमी करण्यासाठी ट्राय करा 'कोल्ड बॉटल मसाज'