रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय 
मुंबई

रेशनकार्डवरील नावाद्वारे कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही! दिवाणी न्यायालयाचा मोठा निर्णय

रेशनकार्डवर नाव नोंदवले म्हणजे ती व्यक्ती त्या कुटुंबातील नातेवाईक होत नाही. त्या नावाच्या आधारे भाडेकरू असल्याचा दावा करता येणार नाही किंवा कोणताही कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई सत्र व दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणात दिला.

Swapnil S

मुंबई : रेशनकार्डवर नाव नोंदवले म्हणजे ती व्यक्ती त्या कुटुंबातील नातेवाईक होत नाही. त्या नावाच्या आधारे भाडेकरू असल्याचा दावा करता येणार नाही किंवा कोणताही कायदेशीर अधिकार सांगता येणार नाही, असा निर्वाळा मुंबई सत्र व दिवाणी न्यायालयाने एका प्रकरणात दिला. दादरच्या हिंदू कॉलनीतील घराचा बेकायदेशीर ताबा मिळवणाऱ्या व्यक्तीच्या हकालपट्टीचे आदेश देताना न्यायालयाने हा निर्वाळा दिला.

दादरमधील हिंदू कॉलनीतील ५०० चौरस फुटांच्या घरावर गेल्या १० वर्षांहून अधिक काळ बेकायदेशीरपणे ताबा मिळवून बसलेल्या व्यक्तीला तात्काळ बाहेर काढण्याचे आदेश दिवाणी न्यायाधीश ए. एच. बेग यांनी दिला. प्रतिवादी मधुकर कदम हे कायदेशीर वारस नसून केवळ एक अतिक्रमणदार आहेत. मूळ भाडेकरू कै. मीरा तेंडुलकर यांच्याशी आपले कौटुंबिक नाते असल्याचा दावा कदम यांनी केला होता. ते सिद्ध करण्यासाठी त्यांनी रेशनकार्डवरील नावाचा संदर्भदिला होता. त्या आधारे कदम यांनी केलेला दावा न्यायालयाने फेटाळून लावला. कदम यांना तेंडुलकर यांच्या कुटुंबाविषयीची प्राथमिक माहिती तसेच गोत्र सांगता आले नाही तसेच दोघांच्या जातीही असल्याचे वेगवेगळ्या न्यायालयात समोर आले.

प्रतिवादी निघाले मदतनीस

हिंदू कॉलनीतील खरेघाट रोडवरील इमारतीचे अमेरिकेत राहणारे मालक हेमंत आणि विनीत सरदार यांनी २०१३ मध्ये हा खटला दाखल केला होता. 'मंगेश महालक्ष्मी' इमारतीमधील तळमजल्यावरील फ्लॅट कै. मीरा तेंडुलकर यांच्या नावावर भाड्याने होता. नोव्हेंबर २०११ मध्ये त्यांच्या निधनानंतर मधुकर कदम तिथे बेकायदेशीरपणे राहत होते. कदम आणि त्यांचे दिवंगत वडील हे मीरा तेंडुलकर यांच्याकडे घरगुती मदतनीस म्हणून काम करत होते आणि केवळ सहानुभूतीपोटी त्यांना तिथे राहू दिले होते, असा युक्तिवाद घरमालकांच्यावतीने करण्यात आला. त्यांचे मत न्यायालयाने मान्य केले.

Mumbai : '२८ ऑक्टोबरपर्यंत भारत सोडा'; ज्ञानेश कुमारांविरोधातील आंदोलनानंतर अभिनेता इम्रान खानला मुंबई पोलिसांची नोटीस

Truecaller शिवाय कळणार कोण करतंय फोन? रिंग वाजताच स्क्रीनवर दिसणार नाव; १ नोव्हेंबरपासून नवा नियम

धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त मध्य रेल्वेच्या २४ विशेष फेऱ्या; १८ ते २२ ऑक्टोबरदरम्यान नागपूरसाठी विशेष गाड्या धावणार

मराठवाड्यात भूजलपातळीत घट; संभाजीनगरात १६९ टँकर सुरू

लग्नाची गोष्ट, पण यावेळी मुलींच्या नजरेतून! 'लग्न आणि बरंच काही' टीमच्या नवशक्तिसोबत खास गप्पा; पूजा म्हणते, 'लग्न करायचं, पण...'