रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार (Photo-@indiarailinfo)
मुंबई

रत्नागिरी पॅसेंजर दादरहून नाहीच; पाचव्या-सहाव्या मार्गिकेनंतर दादरपासून गाडी चालविण्याचा विचार

दिवा स्थानकातून चालविण्यात येत असलेली रत्नागिरी पॅसेंजर दादर स्थानकातून चालविण्याची मागणी होत आहे.

Swapnil S

मुंबई : दिवा स्थानकातून चालविण्यात येत असलेली रत्नागिरी पॅसेंजर दादर स्थानकातून चालविण्याची मागणी होत आहे. मात्र या गाडीमुळे सहा ते सात गाड्यांना थांबवावे लागते. यामुळे कुर्ला-परळ दरम्यान पाचवी-सहावी मार्गिका पूर्ण झाल्यानंतर ही गाडी दादर स्थानकातून सोडण्याचा विचार करण्यात येईल, अशी भूमिका मध्य रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केली.

दादर-रत्नागिरी पॅसेंजर दिवा स्थानकातून चालविण्यात येत असल्याने विविध संघटनांकडून रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त होत आहे. याबाबत मध्य रेल्वेने आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत पत्रकारांनी प्रश्न उपस्थित केले. यावर उत्तर देताना रेल्वे अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली. दादर-रत्नागिरी पॅसेंजर कोरोना नंतर २०२१ मध्ये दादर स्थानकावरून दिवा स्थानकामध्ये शिफ्ट करण्यात आली.

सध्या भूसंपादनाचे काम सुरू

कुर्ला ते परळ दरम्यान पाचवी सहावी मार्गिकेचे काम प्रगतिपथावर आहे. या कामासाठी भूसंपादनाचे काम सुरू असून ही मार्गिका पूर्ण होताच रत्नागिरी पॅसेंजर दादर स्थानकातून चालविण्याबाबत विचार करण्यात येईल, असेही नीला यांनी सांगितले.

राज्यात अवैध प्रवासी वाहतूक मोठ्या प्रमाणावर सुरू; उच्चस्तरीय आढावा बैठकीत अहवाल सादर, अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्याचा इशारा

Mumbai : मिठी नदी गाळ उपसा करण्यात विलंब; किशोरी पेडणेकरांचा हल्लाबोल

मुस्लिम आरक्षण रद्द करण्याच्या निर्णयाला आव्हान; राज्य सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे हायकोर्टाचे आदेश

आसामचे मुख्यमंत्री सर्वाधिक भ्रष्ट - राहुल गांधी; मोदी, शहा, सरमा यांचे आसाममध्ये लँड एटीएम, काँग्रेसची टीका

Navi Mumbai : बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी पती-पत्नीवर गुन्हा; सिडकोच्या अधिकाऱ्याचा प्रताप; ACB च्या चौकशीत उघड