मुंबई

शौचालय घोटाळा प्रकरणी मेधा सोमय्यांनी केलेले आरोप राऊत यांनी फेटाळले

प्रतिनिधी

शौचालय घोटाळ्यात मेधा सोमय्या यांचा सहभाग असल्याचा आरोप केल्याने अडचणीत सापडलेले शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी मानहानीचा आरोप फेटाळून लावला आहे. राऊत यांनी शिवडी न्यायालयात आपल्याला हे आरोप मान्य नसल्याचे स्पष्ट केले. त्यामुळे राऊत यांच्या विरोधातील हा अब्रुनुकसानीचा खटला चालणार हे निश्‍चित झाले.

शिवसेना नेत संजय राऊत आणि किरीट सोमय्या यांच्यात एकमेकांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचे सत्र सुरू असतानाच खा. राऊत यांनी किरीट सोमय्यासह त्यांच्या पत्नी मेधा सोमय्या यांच्यावर शौचालय बांधकामात घोटाळा केल्याचा आरोप केला. मीरा-भाईंदर शहरात १५४ सार्वजनिक शौचालये बांधण्यात आली असून त्यातील १६ शौचालये बांधण्याचे कंत्राट मेधा सोमय्या यांच्या युवा प्रतिष्ठानला मिळाले होते.

'भटकती आत्मा' पंतप्रधान मोदी यांची शरद पवार यांच्यावर टीका; शरद पवार पक्षाच्या नेत्यांचे प्रत्युत्तर

'काँग्रेस'चा संपत्तीच्या फेरवाटपाचा घातक खेळ

प्रचार अर्थपूर्ण व्हायचा तर...

... तर तुम्हाला नक्कीच सुवर्णपदक मिळेल; फडणवीसांचा 'तो' व्हिडिओ पोस्ट करत रोहित पवारांचा टोला

अमित शहांच्या भाषणाचा एडिट केलेला व्हिडिओ व्हायरल, FIR दाखल