PM
मुंबई

महादेव बेटिंग ॲपचा सह-संस्थापक रवी उप्पलला दुबईतून अटक

२०१७ मध्ये रवी आणि सौरभ यांनी मिळून ऑनलाइन सट्टेबाजीद्वारे पैसे कमवण्यासाठी वेबसाइट तयार केली

नवशक्ती Web Desk

मुंबई : महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपचा सह-संस्थापक रवी उप्पल याला दुबईच्या स्थानिक पोलिसांनी संयुक्त अरब अमिराती (यूएई) मध्ये ताब्यात घेतले आहे. महादेव ॲपचा दुसरा प्रवर्तक सौरभ चंद्राकरलाही लवकरच अटक होण्याची शक्यता आहे. त्याच्या ठिकाणाची माहिती पोलिसांना मिळाली आहे. उप्पलला भारतात आणण्यासाठी भारतीय एजन्सी यूएई अधिकाऱ्यांच्या संपर्कात आहेत. ईडीच्या विनंतीवरून इंटरपोलने रवी उप्पल विरोधात आधीच रेड कॉर्नर नोटीस जारी केली होती.

कथित बेकायदेशीर सट्टेबाजीशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी महादेव ऑनलाइन बेटिंग अ‍ॅपशी संबंधीत मुंबई, कोलकाता आणि भोपाळमधील ३९ ठिकाणी ईडीने दोन महिन्यांपूर्वी छापे टाकून ४१७ कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली होती. या प्रकरणात बॉलिवूडच्या काही सेलिब्रिटींची नावेही पुढे आली आहेत. या प्रकरणाची छत्तीसगड पोलिस आणि मुंबई पोलिसांबरोबरच ईडीकडून चौकशी सुरू आहे. तपास एजन्सीने ऑक्टोबरमध्ये रायपूर येथील विशेष मनी लॉन्ड्रिंग प्रतिबंध कायदा (पीएमएलए) न्यायालयात उप्पल आणि त्याचा भागीदार सौरभ चंद्राकर यांच्याविरुद्ध मनी लॉन्ड्रिंगचे आरोपपत्र दाखल केले होते. रवी उप्पल हा सौरभ चंद्राकरसोबत यूएईमध्ये राहत होता. अवघ्या महिन्याभरापूर्वी केंद्र सरकारने महादेव बेटिंग अ‍ॅपसह २२ बेकायदेशीर बेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स ब्लॉक करण्याचा आदेश जारी केला होता.

२०१७ मध्ये रवी आणि सौरभ यांनी मिळून ऑनलाइन सट्टेबाजीद्वारे पैसे कमवण्यासाठी वेबसाइट तयार केली. तथापि, सुरुवातीला या वेबसाइटचे वापरकर्ते कमी होते आणि त्यातून फारच कमी कमाई होत होती. २०१९ मध्ये सौरभ नोकरीसाठी दुबईला गेला. काही वेळाने सौरभने त्याचा मित्र रवी उप्पल यालाही दुबईला बोलावले. रवी दुबईला पोहोचण्यापूर्वी सौरभने बेटिंग वेबसाइटच्या माध्यमातून पैसे कमवण्याची संपूर्ण योजना तयार केली होती. यानंतर दोघांनी महादेव बुक ऑनलाइन बेटिंग वेबसाइट आणि अ‍ॅप तयार केले. सोशल मीडिया आणि इतर माध्यमातून त्याचा प्रचार सुरू केला.

महादेव कंपनीचा व्यवसाय वाढवण्यासाठी सौरभने सोशल मीडिया मार्केटिंग आणि प्रभावकर्त्यांद्वारे अ‍ॅपची जाहिरात केली. आणि इतर बेटिंग अ‍ॅप्स आणि वेबसाइट्स विकत घेतल्या. व्यवसाय वाढवण्यासाठी ऑनलाइन सट्टेबाजी अ‍ॅपच्या माध्यमातून सौरभ चंद्राकर आणि रवी उप्पल यांनी देशात सुमारे ४ हजार पॅनल ऑपरेटर्सचे नेटवर्क तयार केले होते. प्रत्येक पॅनल ऑपरेटरकडे २०० ग्राहक होते, ज्यांनी बेट लावले. असे म्हटले जात आहे की अशा प्रकारे दोघेही दररोज २०० कोटी रुपये कमवत होते. या काळ्या पैशातून त्यांनी संयुक्त अरब अमिरातीमध्ये आपले साम्राज्य प्रस्थापित केले.

ओला दुष्काळ जाहीर करण्यास मुख्यमंत्री फडणवीसांचा नकार; पण सर्व सवलती लागू, दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदतीचे आश्वासन

"२६/११ नंतर पाकिस्तानला प्रत्युत्तर देणार होतो, पण...; पी. चिदंबरम यांचा गौप्यस्फोट

Pakistan Blast : पाकिस्तान हादरले! क्वेट्टामध्ये आत्मघाती बॉम्बस्फोट, १० ठार, भयानक व्हिडिओ समोर

Dombivali : झोपेतच सर्पदंश! ३ वर्षांच्या चिमुकलीसह मावशीचा मृत्यू; KDMC रुग्णालयावर निष्काळजीपणाचा आरोप

पावसाची विश्रांती; पूरस्थिती कायम! पूरग्रस्त शेतकऱ्यांना हवा मदतीचा आधार; अतिवृष्टी, गारपीट, टंचाईग्रस्तांना जिल्हा वार्षिक निधीतून मदत