मुंबई

रिलायन्स इंडस्ट्रीजमुळे थांबली सेन्सेक्सची घसरगुंडी

दिवसभरात सेन्सेक्स ४२७.७९ वर जाऊन ५५,३२०.२८ बंद झाला. तर निफ्टी १२१.८५ ने वाढून १६४७८.१० वर बंद झाला.

वृत्तसंस्था

गेले चार दिवस मुंबई शेअर बाजारात सुरू असलेली सेन्सेक्सची घसरगुंडी गुरुवारी थांबली. सेन्सेक्समधील रिलायन्स इंडस्ट्रीजने सेन्सेक्सला मोठा आधार दिला.

गुंतवणूकदार आयटी, फार्मा व बँक समभागांबाबत अतिशय सावध होते. दिवसभरात सेन्सेक्स ४२७.७९ वर जाऊन ५५,३२०.२८ बंद झाला. तर निफ्टी १२१.८५ ने वाढून १६४७८.१० वर बंद झाला.

डॉ. रेड्डीजबरोबरच रिलायन्स इंडस्ट्रीज, भारती एअरटेल, सन फार्मा, टेक महिंद्रा, कोटक महिंद्रा बँक, विप्रो व इन्फोसिस आदी कंपन्यांचे समभाग वधारले. तर एनटीपीसी, टाटा स्टील, बजाज फायनान्स, एसबीआय, एशियन पेंटस‌्, एचसीएल टेक आदी कंपन्यांचे समभाग घसरले. सेन्सेक्समधील ३० पैकी २० कंपन्यांचे समभाग वधारले. जागतिक बाजारातील अस्थिरतेचा परिणाम भारतीय बाजारावर होत आहे. तसेच जगातील मध्यवर्ती बँकांच्या लवकरच बैठक होणार आहे. या बैठकीतील निर्णयांची गुंतवणूकदार वाट पाहत आहेत.

अमेरिकन फेडरलचे धोरण लवकरच होणार आहे. त्यामुळे परकीय वित्तसंस्था दक्ष आहेत. व्याजदरात ०.५० बेसिस पॉईंटने वाढ झाल्यास धोका निर्माण होऊ शकतो, असे जिओजित फायनान्शियल सर्व्हिसेसचे संशोधन प्रमुख विनोद नायर म्हणाले. शांघाय, सेऊल, हँगकँग येथील बाजार घसरले तर टोकियो बाजार वधारला. जागतिक बाजारात तेलाच्या किंमती प्रति पिंप १२३.४२. डॉलर्सवर पोहचल्या आहेत. तर डॉलर्सच्या तुलनेत रुपया ८ पैशांनी घसरून ७७.७६ वर बंद झाला. परकीय वित्तसंस्थांनी बुधवारी २४८४.२५ कोटींचे समभाग विकले.

एकत्र आणणं माननीय बाळासाहेबांना जमलं नाही, ते देवेंद्र फडणवीसांना जमलं; राज ठाकरेंचा हल्लाबोल

उद्धव ठाकरे यांचे आक्रमक भाषण; म्हणाले ''हिंदू आणि हिंदुस्थान मान्य आहे; पण हिंदीची सक्ती मान्य नाही!''

''कुठचाही 'झेंडा' नाही, मराठी हाच 'अजेंडा'; माझ्या मराठीकडे-महाराष्ट्राकडे वेड्यावाकड्या नजरेने पाहायचं नाही,'' वाचा राज ठाकरे यांचं संपूर्ण भाषण

दोघा पुतण्यांचे हात धरून सुप्रिया सुळेंनी काकांच्या शेजारी केलं उभं; पहा Video

''जर इथे येऊन धंदा करताय तर मराठी बोलायची लाज कसली?'' अभिनेते भरत जाधव यांचा संतप्त सवाल